दुबई - मध्य-पूर्वेतील 40 टक्के संपत्ती प्रदेशातील 157 अब्जाधीशांच्या नावे आहे. संपत्तीचा हा आकडा 354 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे.
जगातील कोणत्याही प्रदेशाच्या तुलनेत मध्य-पूर्वेतील अब्जांधीशांची संपत्ती डोळे दिपवणारी आहे. वेल्थ-एक्स व यूबीएस बिलिनियर सेन्सस 2013च्या पाहणीनुसार हा आकडा खूप मोठा आहे. गर्भश्रीमंताहून अधिक वैभव असलेल्या वर्गाकडील संपत्ती जगात कोठेही पाहायला मिळत नाही. युरोपात गर्भश्रीमंतांकडील एकूण संपत्ती 28 टक्के आहे. उत्तर अमेरिकेत 22 तर आशियात हे प्रमाण 18 टक्क्यांवर आहे. सौदी अरेबियातील अब्जाधीशांचा देशातील एकूण 70 टक्के संपत्तीवर अंकुश आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हे प्रमाण 24 टक्के आहे. युरोप (766), उत्तर अमेरिका (552), आशिया (508), लॅटिन अमेरिका (111), आफ्रिका (42) अशी खंडनिहाय श्रीमंतीची क्रमवारी आहे.