आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 41 Children And Other 7 Killed In Bomb Blast At Syria

VIDEO: सीरियातील शाळेत बॉम्बस्फोट, 41 विद्यार्थ्यांसह 48 जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दमिश्क - सीरियाच्या होम्स शहरात एका शाळेवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 41 विद्यार्थ्यांसह एकूण 48 जण ठार झाले आहेत. सीरिया ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने दिलेल्या माहितीनुसार बशर सरकारच्या नियंत्रणात असणा-या शाळेच्या इमारतीत दोन जोरदार स्फोट झाले. त्यात एकूण 48 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी 12 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील होते.

घटनास्थळाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

ऑब्झर्व्हेटरीचे डायरेक्टर रमी अब्दुल रहेमान यांनी सांगितले की, 'होम्स शहरातील अकराम अल-मख्जूमी शाळेत दोन स्फोटात जवळपास 41 विद्यार्थी ठार झाले. तसेच अनेक मुले अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मृतांमधील प्रौढ व्यक्तींपैखी चार नागरिक आणि तीन सैनिक होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका आत्मघातकी हल्लेखोराने हे दोन्ही स्फोट घडवून आणले. ऑब्झर्व्हेटरीने दिलेल्या माहितीनुसार, 'दहशतवाद्याने आधी शाळेच्या एका भागात स्फोट घडवले आणि नंतर दुसरीकडे जावून स्वतःकडील स्फोटकांचा स्फोट घडवला.

बशर समर्थक संघटनांनी फेसबूक आणि ट्वीटरवर स्फोटानंतरची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. इंटरनेटवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये स्फोटानंतर रस्त्यावर विद्यार्थ्यांचे मृतदेह विखुरलेले आढळत आहेत.
ISIS ने दहा जणांचे शीर उडवले
ISIS या दहशतवादी संघटनेने सिरियाच्या उत्तर कुर्द क्षेत्रात तीन महिलांसह दहा लोकांचे शीर उडवले आहे. सिरियाच्या एका मानवाधिकार संघटनेच्या एका प्रमुख अधिका-याने ही माहिती दिली आहे. दहशतवाद्यांनी सिरियाच्या कुर्दीश भागातील कोबानी पासून 14 किलोमीटर अंतरावर तुर्कस्तानच्या सीमेजवल हे कृत्य केले. या दहा जणांमध्ये तीन महिलांचाही समावेश होता.
पुढील स्लाइड्डवर पाहा घटनेनंतरचा व्हिडिओ आणि PHOTO's