आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 41 Children Killed In Bombing In Syria, Divya Marathi

सिरियातील शाळेवर बॉम्बगोळे, ४१ मुलांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरूत - सिरियातील होम्स नावाच्या शहरातील शाळेवर अज्ञात व्यक्तीने बॉम्बवर्षाव केला. यात ४१ सिरियन मुलांचा अंत झाला. मृतांमध्ये चार नागरिक आणि तीन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. अनेक मुले अद्याप बेपत्ता आहेत.

हल्लेखोराने पूर्वी एक स्फोट घडवून आणला. दुस-या वेळी स्फोटके अंगावर लादून त्याने शाळेत प्रवेश केला. यात हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचे मानवाधिकार आयोगाचे संचालक रामी अब्देल रहेमान यांनी सांगितले. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता अधिकृत सूत्रांनी वर्तवली आहे. दुसरीकडे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने कुर्दिश भागातील ऐन-अल-अरब या शहरावरच्या दिशेने चढाई करण्यास सुरुवात केली आहे. आयएसच्या स्थानिक संघटनेने आक्रमकपणे चाल केली असून आग्नेय भागातील महत्त्वाचे शहर असलेल्या कोबानवरही लवकरच ताबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोबान | दहशतीच्या छायेखाली असलेल्या नागरिकांनी संसार पाठीवर घेऊन सिरिया-तुर्की सरहद्द परिसरातील काही गावांत आश्रय शोधला आहे. त्यात एक बाळ बेवारस आढळून आल्यानंतर सैनिकाने त्याच्या आई-बाबांचा शोध घेतला.