आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशमध्‍ये इस्‍लामी नेत्‍याला फाशी सुनावल्‍यानंतर हिंसा, 42 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- बांगलादेशातील 1971च्या मुक्ती संग्रामात केलेल्या युद्धगुन्ह्यांसाठी दोषी ठरवलेल्या एका ज्येष्ठ इस्लामी नेत्याला बांगलादेशातील कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली. त्‍यानंतर बांगलादेशात हिंसा भडकली असून आतापर्यंत 42 जणांचा त्‍यात मृत्‍यू झाल्‍याची माहिती आहे. हा आकडा आणखी वाढण्‍याची शक्‍यता आहे.

दिलावर हुसैन सईदी असे या नेत्‍याचे नाव आहे. सईदीला फाशी ठोठावल्‍यानंतर एकीकडे सामाजिक कार्यकर्त्‍यांनी स्‍वागत केले. तर शिक्षेचा विरोध करणारेही रस्‍त्‍यांवर उतरले. शिक्षेचे विरोधी पक्षाने स्वागत केले. मात्र सईदी यांचा पक्ष जमात-ए-इस्लामीने विरोध केला आहे. हा निर्णय एकतर्फी असल्‍याचे पक्षाचे म्‍हणणे आहे. युद्धगुन्‍ह्यांसाठी फाशीची शिक्षा सुनावलेला संघटनेचा हा तिसरा नेता आहे.

यापूर्वी अबुल कलाम आझाद आणि अब्‍दुल कादीर मुल्‍ला या दोघांना फाशी ठोठावण्‍यात आली आहे. 1971 च्‍या बांगलादेश मुक्ती संग्रामात पाकिस्‍तानी समर्थकांनी देशात प्रचंड अत्‍याचार केले होते.