आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘कृपया थोडा वेळ प्रतीक्षा करा..तुमचा कॉल आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी लवकरच संपर्क करून देऊ.. हे वाक्य ऐकल्यावर तुम्हाला राग येत असेल, पण ऑ टोमेटेड कस्टमर सर्व्हिस कॉलदरम्यान होल्डवर ठेवण्यात आपल्या आयुष्यातील 43 दिवस जातात, त्या दिवसांपैकीच हे काही क्षण असतात, हे वास्तव जाणून घेतल्यावर तुमचा राग शांत होऊ शकतो. डाटा कलेक्शन प्रोव्हायडर रिसर्च नाऊच्या एका अध्ययनानुसार ही माहिती पुढे आली आहे. 500 ग्राहकांवर संशोधन केल्यानंतर रिसर्च नाऊला जाणवले की, 58 टक्के लोक या प्रक्रियेदरम्यान नाराज होतात.
48 टक्के लोकांना कॉल सेंटरशी संपर्क साधणे व्यर्थ वाटते, तर 86 टक्के लोकांनी अशा ठिकाणी कॉल केल्यावर त्यांना होल्डवर ठेवले असल्याचे सांगितले. टॉल्कटोतर्फे हे अध्ययन करण्यात आले. टॉल्कटोचे सीईओ स्टुअर्ट लिव्हिन्सन यांच्या मते, कस्टमर सर्व्हिस चॅनेलमध्ये फोन हा योग्य पर्याय नसल्याचे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे. कंझ्युमर वर्ल्डडॉट ओआरजीचे संस्थापक अॅडगर डॉर्स्की यांच्या मते, तुम्ही कस्टमर सर्व्हिसला फोन करता तेव्हा होल्डवर राहावे लागणार, हे तुमच्या आयुष्यातील सत्य आहे. गेल्या वर्षी क्वांट्स एअरलाइनमध्ये तिकीट कंफर्म करण्यासाठी फोन केल्यानंतर होल्डवर राहणे हा ऑ स्ट्रेलियन लोकांच्या लाइफस्टाइलचा एक भाग बनला होता. विमान कंपनीने ग्राहकांना सुमारे 13 मिनिटे होल्डवर ठेवल्याचे टेक प्रोव्हायडर फास्टकंझ्युमर या कंझ्युमर सर्व्हिसला आढळून आले. फास्टकंझ्युमरद्वारे दीर्घ काळ फोनवर होल्डवर ठेवण्यात क्वांट्सनंतर एअर कॅनडा, डेल्टा, साऊथ वेस्ट आणि जेटब्लू या विमान कंपन्यांचा क्रमांक होता.
huffingtonpost.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.