बगदाद - इराकच्या तिक्रित शहरातील एका रुग्णालयाच्या तळघरात जीव मुठीत धरून राहत असलेल्या 46 भारतीय परिचारिका ब्रेडच्या तुकड्यावर जगत आहेत. काही परिचारिकांनी आपल्या कुटुंबीयांना फोन करून याबाबतची माहिती दिली. दरम्यान, इराकच्या हिंसाचारग्रस्त भागातून आतापर्यंत 600 भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे.
दुसरीकडे आणखी 900 भारतीयांना लवकरच इराकमधून बाहेर काढले जाईल. केरळमधील परिचारिका रुग्णालयात अडकल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. सर्व परिचारिका भेदरलेल्या आहेत.