आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

86 तासांत 500 कि.मी. धाव, 47 वर्षीय महिलेचा विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन - न्यूझीलंडमधील महिलेने न झोपता सलग 86 तासांत 500 कि.मी.ची धाव पूर्ण केली. हा एक विक्रम ठरला आहे. याआधी 2005 मध्ये अमेरिकेच्या पाम रीड यांनी 80 तासांत 486 कि.मी. अंतर कापले होते. चार मुलांची आई असलेल्या किम एलन (47) यांनी गुरुवारी सकाळी ऑकलंड येथून धावण्यास सुरुवात केली. रविवारी रात्री 8.35 वाजता ही दौड पूर्ण झाली. फिनिशिंग लाइनवर येताच त्यांना 3,483 डॉलरचा (सुमारे 21 लाख रुपये) चेक मिळाला. त्यांनी तो एका स्पाइल ट्रस्टला दिला.
विश्वासच बसत नाही : स्पर्धेच्या वेळी मागचा विक्रम माडीत काढल्याचे किमला सांगितले नव्हते. त्यांचे चाहते 500 कि.मी.वर थांबलेले होते. तेथे पोहोचल्यावर किम म्हणाल्या, मी हे केले यावर माझाच विश्वास बसत नाही.