आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 50 Hindu Couples Mass Wedding In Karachi City In Pakistan

PHOTOS:पाकिस्तानातील सामुहीक विवाह सोहळ्यात 50 हिंदु जोडपे अडकले लग्नाच्या बेडीत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- पाकिस्तानातील कराची शहरात नुकत्याच झालेल्या सामूहीक विवाह सोहळ्यात 50 हिंदु जोडपे लग्नाच्या बेडीत अडकले. पाकिस्तानातील हिंदु परिषदेने या सोहळा आयोजित केला होता. सर्व जोडप्यांचा वैदिक पद्धतीने विवाह संपन्न झाला.

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना त्यांच्या मुला-मुलींचे विवाह करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे हिंदु परिषदेचे सदस्य भीमराज यांनी सांगितले. 2008 पासून या सामुहीक विवाह सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
इब्राहिम हैदरी येथून आलेले किरण व अनिल या दाम्पत्याने सांगितले की, या सामुहिक विवाह सोहळ्यातून त्यांच्या वैवाहीक आयुष्याला सुरुवात झाली होती.

आयोजन स्थळी मोठा मंडप उभारण्यात आला होता. संपूर्ण मंडप झेंडूसह विविध फुलांनी सजवण्यात आला होता. मंडपाच्या मध्यमागी एका व्यासपीठावर वर-वधूच्या सप्तपदीसाठी यज्ञ तयार करण्‍यात आला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, पाकिस्तानात‍ वैदिक पद्धतीने झालेल्या सामुहीक विवाह सोहळ्याची छायाचित्रे...