आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 विद्यार्थ्यांची नायजेरियात हत्या; कट्टरवादी गटावर संशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटिस्कम (नायजेरिया)- उत्तरपूर्व नायजेरियामध्ये संशयित कट्टरवाद्यांनी एका महाविद्यालयात घुसून 50 विद्यार्थ्यांची हत्या केली. हा हल्ला शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ग्रामीण गुजबा प्रांतात झाला. योबे स्टेट कॉलेज ऑफ अँग्रिकल्चरचे मोलिमा एदी मातो यांनी सांगितले की, महाविद्यालयात घुसलेल्या अज्ञात बंदूकधार्‍यांनी क्लासरूमलाही आग लावली. तत्पूर्वी त्यांनी कॅम्पसमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. त्यात किमान 50 जण ठार झाले. कॉलेजपासून दूर 40 किलोमीटर अंतरावरील दमतरू येथे एका वसाहतीमधील शाळेतही अशाच प्रकारे हल्ला झाला. त्यात मरण पावलेल्यांची संख्या अद्याप कळली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या भागात मृतदेह जमा करताना सुरक्षा दलाची दमछाक होत आहे.