आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 500 Hundred Old British Post Department Will Privatized

500 वर्ष जुन्या ब्रिटिश टपाल खात्याचे खासगीकरण, सरकारी प्रस्ताव जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या सुमारे 500 वर्षे जुन्या रॉयल मेल या पोस्टल सेवेचे पन्नास टक्के खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गुरुवारी सरकारकडून त्या संबंधीचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला. सरकार
या सेवेचे समभाग विक्रीला काढणार आहे.


सन 1516 मध्ये किंग हेन्री (आठवा) यांनी रॉयल मेल या पोस्टल सेवेची स्थापना केली होती. रॉयल मेलचा समावेश लवकरच लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्ये होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. आगामी काही आठवड्यांत पोस्टल सेवेचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे सरकारने जुलैमध्येच जाहीर केले होते. त्यानुसार, पन्नास टक्के खासगीकरणाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. रॉयल मेलच्या फेररचनेसाठी संसदेमध्ये दोन वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे हा निर्णय असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. कंपनीच्या एकूण समभागांपैकी 10 टक्के समभाग रॉयल मेलच्या 15 हजार कर्मचा-यांना मोफत देण्यात येणार आहे. 2009 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला होता.


तीन दशकांतील सर्वात मोठा निर्णय
सरकारने घोषणेनुसार रॉयल मेलचे खासगीकरण केले तर 1980 नंतरचे देशातील हे सर्वात मोठे खासगीकरण ठरेल. अगोदर ब्रिटिश गॅस, ब्रिटिश टेलिकॉम कंपन्यांचे खासगीकरण करण्यात आले होते.
काय होणार फायदा ? : रॉयल मेलचे खासगीकरण झाल्यानंतर कंपनीला भांडवल उभारणीची परवानगी मिळणार आहे. त्याचबरोबर आधुनिकीकरण, ऑनलाइन शॉपिंग वितरण इत्यादीची देखील परवानगी मिळेल.


1516 इसवी सनामध्ये टपालखात्याची स्थापना
4.74 अब्ज डॉलर्स एवढे रॉयल मेलचे एकूण मूल्य