आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 500 Top Australian Ceos Will Attend Prime Minister Modi's Lecture

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑस्ट्रेलियात क्लास, 500 कंपन्याच्या सीईओंना देणार व्याख्‍यान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौ-यात 18 नोव्हेंबर रोजी मेलबर्नमधील मोठ्या कंपनीच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी( सीईओ) आणि व्यवस्थापिकीय संचालकांसमोर व्याख्‍यान देणार आहेत.यात जवळ-जवळ 500 सीईओ उपस्थित राहणार आहे. मोदी शनिवार(ता.15) व रविवार(ता.16) होत असलेल्या जी-20 देशांच्या परिषदेत सहभागी होण्‍यासाठी ऑस्ट्रेलियाला जात आहे.
28 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला जाणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधींनंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने ऑस्ट्रेलियाला भेट दिलेली नाही. 18 नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्‍ये होणा-या मोदींच्या व्याख्‍यान ऐकण्‍यासाठी प्रेट उद्योगाचे प्रमुख अँथनी जोसेफ प्रेट, बीएचपी बिल‍िंटन लिमिटेडचे अँड्र्यू मॅकेंझी, फ‍िल एडमंड्सचे व्यवस्थापक रिओ टिंटो आणि एचएसबीसी ऑपरेशन इन ऑस्ट्रेलियाचे सीईओ टोनी क्रिप्स उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच भारतातील गौतम अदानी, महिंद्र ग्रुपचे आनंद महिंद्रा आणि इन्फोसिसचे विशाल सिक्का असतील.