फाइल फोटो : वाघा बॉर्डरवरील हल्ल्यानंतर मृतदेह घेऊन जाताना नागरिक.
लाहोर - वाघा बॉर्डरजवळ पाकिस्तानच्या सीमेत झालेल्या आत्मघातकी स्फोटात पाकिस्तानचे सुमारे 60 जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच 200 हून अधिक लोक जखमी झाल्याचेही समजते आहे. बॉर्डरवर दोन्ही बाजुला होणा-या दैनंदिन कार्यक्रमांच्या नंतर हा स्फोट झाला.
पाकिस्तानी पोलिसांनी आत्मघातली हल्लोखोराचे वय 20 च्या आसपास असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याने सोबत सुमारे 20 ते 25 किलो स्फोटके आणली होती अशी माहितीही मिळाली आहे. त्यापैकी काही विस्फोटके त्याने जॅखेटमध्ये लपवली होती. या तरुणाला परेड ग्राऊंडच्या बाहेरच अडवण्यात आले त्यावेळी त्याने त्याठिकाणी स्फोट घडवला. घटनेनंतर काहीवेळ हा सिलिंडर स्फोट असल्याची चर्चा पसरसली होती.
सुरक्षा अधिका-यांच्या मते अनुसार रविवार असल्याने रिट्रीट सेरेमनी पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या जास्त होती. पंजाब पोलिसांचे महानिरीक्षक मुश्ताक सुखेरा यांनी सांगितले की, 'सेरेमनी संपल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक बाहेर जात होते. त्याचवेळी आत्मघातकी हल्लेखोराने एका गेटजवळ हा स्फोट घडवला.' मृतांमध्ये तीन रेंजर्सचाही समावेश आहे.
तीन दिवस बीटिंग रिट्रीट सोहळा रद्द
हल्ल्यामुळे रोज होणारा बीटिंग रिट्रीट कार्यक्रम तीन दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीएसएफनेही वाघा बॉर्डरवर सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. वाघा बॉर्डरवर रोज 'ध्वज उतरवताना' हा सोहळा आयोजित करण्यात येत असतो. त्यावेळी रोज सीमेच्या दोन्ही बाजुंना नागरिक मोठ्या संख्येने जमत असतात.
भारतीय पर्यटकांना सांगितले टायर फुटले
अटारी-वाघा बॉर्डरवर रीट्रीट सेरेमनी पाहण्यासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांना या स्फोटाचा आवाज आला. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता लक्षात घेत हा चायनीज टायरचा ब्लास्ट असल्याचे सांगितले. मुंबईच्या एका शाळेतील मुलांना घेऊन आलेले क्रीडा शिक्षक लक्ष्मिकांत भंडारी यांनी सांगितले की, आम्हाला दहशतवादी हल्ला झाल्याची शंका आली होती. पण सुरक्षारक्षकांनी टायरचा स्फोट असल्याचे सांगितले. पण पाकिस्तानच्या हद्दीत उठलेले आगीचे लोट पाहून आम्हाला विश्वास त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आत्मघातली हल्ल्यानंतरचे PHOTO