अटलांटा - सर्वात लांब केस राखणार्या आशा मंडेला यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांचे केस 55 फूट लांब आहेत. केसांची अधिक लांबी असेल तर त्यांना अर्धांगवायू होऊ शकतो, असा इशारा संशोधकांनी आशा यांना दिला होता. परंतु मंडेला यांचा निर्धार कायम होता. त्यांनी केस कापण्यास स्पष्ट नकार दिला. जॉजिर्याच्या अटलांटामध्ये राहणार्या आशा मंडेला केसांची लांबी अशीच राखण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
लांब केसांमुळे पाठीचे दुखणे निर्माण होऊन हाड तुटण्याचीदेखील भीती आहे, असे एका मुलाची आई असलेल्या आशा यांना डॉक्टरांनी दाखवली होती. त्यानंतरही आशा यांचा निर्धार कायम आहे. केस कापणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे असल्याचे त्यांना वाटते.