आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 55 Killed, 200 Injured In Blast In Pakistan Near Wagha Border

पाकिस्तानात वाघा बॉर्डरवरील आत्मघाती हल्ल्यात ५५ ठार, २०० जण जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानात वाघा बॉर्डरजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ५५ जण ठार झाले. भारतीय सीमेपासून केवळ ५०० मीटर अंतरावर झेंडा उतरवताना झालेल्या या स्फोटात २०० जण जखमी झाले. या स्फोटाची जबाबदारी जुनदुल्लाहसह तीन दहशतवादी संघटनाने स्वीकारली आहे.

पाकिस्तानात पंजाब प्रांतात वाघा सीमेजवळ रविवारी सायंकाळी दहशतवादी हल्ला झाला. पंजाब प्रांताचे आयजी मुश्ताक सुखेरा यांनी सांगितले की, हा एक दहशतवादी हल्ला होता. सीमेवर ध्वज उतरवण्याचा नियमित सोहळा सुरू असताना पार्किंग स्थळाजवळ स्फोट झाला. मीडियाच्या रिपोर्टनुसार निमलष्करी दलाच्या चौकीजवळ एका दहशतवाद्याने स्वत:ला उडवले. त्यात अनेक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.