आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात बस अपघात, ५६ ठार, मृतांत १८ मुले, दक्षिण सिंध प्रांतात ट्रकला टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - प्रवासी बस आणि ट्रक यांच्यातील टकरीमध्ये ५६ जण ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली. अपघात भीषण होता. ५६ प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये २१ महिला आणि १८ मुलांचा समावेश आहे. वायव्येतील सुक्कुर जिल्ह्यात ही भीषण घटना घडली.

खैबर-पख्तुनख्वा प्रांतातून कराचीकडे जाणारी प्रवासी बस तेहरी बायपासजवळ एका ट्रकवर आदळली. अपघातात ५६ जण ठार झाले. जखमींना तातडीने सुक्कुर आणि खैरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली, अशी
प्राथमिक माहिती आहे.
दुसरीकडे मात्र वाहनाला आेव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली, असे स्थानिक प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. बसने आेव्हरटेक केले, परंतु त्यानंतर समोरून येणा-या ट्रकला गाडीने टक्कर दिली, असे माध्यमातील बातम्यांत नमूद करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन व सिंध प्रांताचे राज्यपाल इशरतुल इबाद यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेच्या चौकशीचेही आदेश बजावण्यात आले आहेत.
वायव्य आदिवासी भागात ४ सुरक्षा दल, १५ अतिरेकी ठार
पेशावर - पाकिस्तानच्या वायव्य आदिवासी भागात मंगळवारी झालेल्या वेगवेगळ्या हिंसाचारात १५ अतिरेकी ठार झाले. घटनेत सुरक्षा दलाचे ४ जवानही मृत्युमुखी पडले. ओरकझाई जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातील संघर्षात १५ अतिरेकी ठार झाले. त्यात सहा जवान जखमी झाले. आेरकझाईमधील दहशतवादी तळावरून अतिरेक्यांना पळवण्यात यश आले आहे. जूनपासून दहशतवादविरोधी मोहिमेत आतापर्यंत १ हजार १०० अतिरेक्यांना ठार करण्यात यश आल्याची माहिती लष्करी अधिका-यांनी दिली.