आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 देशांच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यास विमानांना आहे धोका, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअर अल्जेरीयाचे एक विमान अफ्रिकेच्या मालीमध्ये कोसळले आहे. विमानात 110 प्रवाशांसह 6 चालक प्रवास करत होते. या अपघातात सर्वच प्रवाशी मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज बांधला जात आहे. आता, एअर अल्जेरीयानेसुध्दा विमान कोसळल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. एअर अल्जेरियाच्या AH- 5017 या विमानाने बुर्कीनो फासोची राजधानी ओगादुगूवरून अल्जेरियाला जाण्यासाठी उड्डाण केले होते.
अधिका-यांच्या सांगण्यानुसार, एएच 5017ने बुर्किना फासोवरून उड्डाण केल्यानंतर जवळपास 50 मिनीटांनंतर विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर शोध अभियान सक्रिय करण्यात आले.
गाओ-टेसालिटच्यामध्ये विमान कोसळले.
सुरुवातीला माध्यमांच्या रिपोर्टमध्ये नायजेरमध्ये विमान कोसळल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु मालीमध्ये यूनायटेड मिशनवर कार्यरत असलेले जनरल कोको एसीन यांनी सांगितले, की विमान गाओ आणि टेसालिटच्यामध्ये कोसळले आहे. कोको यांनी ही माहिती डॉयची प्रेस एजेंसीला दिली आहे.
आठवड्यात तिसरा विमान अपघात
एका आठवड्यात हा तिसरा विमान अपघात आहे. बुधवारी (23 जुलै) तैवानमध्ये इमरजन्सी लँडिंग करताना जीई222 या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात 51 लोकांचा मृत्यू झाला. यापूर्वी गुरुवारी 17 जुलैला मलेशियन एअरलाइन्सचे प्रवासी विमान 'एमएच17'वर युक्रेनमध्ये अतिरेक्यांनी क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्यामध्ये 298 प्रवाशांचा मृत्यू झाला.
येथून उड्डाण धोकादायक
यूक्रेन प्रकरणानंतर अमेरिकेचे फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन (एफएए)ने सहा देशांमध्ये उड्डाणावर बंदी घातली आहे. इथियोपिया, इराक, लीबिया, उत्तर कोरिया, सोमालिया आणि यूक्रेन या देशांचा यात सामावेश आहे. या देशांतून उड्डाण करणे एखाद्या धोक्यापेक्षा कमी नाही.
पुढे वाचा... जाणून या सहा देशांविषयी जिथून अमेरिकेने उड्डाण करण्यात घातली आहे बंदी...