आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केनियातील सोमालियन दहशतवाद्यांच्या हल्लात 6 भारतीयांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैरोबी/अंबुजा - केनियातील शॉपिंग मॉलवर दोन दिवसांपासून अल शबाब या सोमालियन दहशतवादी टोळक्याचाच कब्जा आहे. या हल्ल्यात सहा भारतीयांसह 59 जण ठार, तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींतही अनेक भारतीय आहेत. इस्रायलच्या मदतीने केनियाचे सैनिक अतिरेक्यांशी संघर्ष करत आहेत. तथापि, मॉलमध्ये नेमके किती अतिरेकी आणि किती ओलीस आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.


मृत भारतीयांमध्ये 40 वर्षीय र्शीधर नटराजन, 8 वर्षीय परमशू जैन आणि 16 वर्षीय नेहल वेकरिया, ज्योती वाया, मालती यावा आणि नेहा मशरू यांचा समावेश आहे. नटराजन एका फार्मा कंपनीत काम करत होते. मृतांत फ्रान्स, कॅनडा, चीन आणि दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत