आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, अमेरिकन पत्रकाराची हत्या करणा-या ISIS बाबतची सहा मिथके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( इराकच्या जवानांवर गोळीबार करताना आयएसआयएसचे दहशतवादी )

अमेरिकन पत्रकार जेम्स फोलेच्या हत्येनंतर आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा जगासमोर क्रूर चेहरासमोर आला आहे. येल विद्यापीठाचे राज्यशास्त्रज्ञ स्‍टाथिस कॅलिस यांच्या मतानुसार, सुन्नी दहशतवाद्यांचा हा समुह मध्‍ययुगीन विचारधारेशी प्रेरि‍त आहे. इराक आणि सीरियाचा इतिहास समजून घेतल्यानंतरच आयएसआयएसबाबत काही अंदाज बांधता येतील. त्यांचा मुख्‍य उद्देश इस्लामिक राज्य इराक आणि सीरियामध्‍ये स्थापन करायचे आहे. जिथे इस्लामिक कायद्यांचे पालन होईल. त्यासाठी हा दहशतवादी समुह सध्‍या मार्गक्रमण करित आहे.
आयएसआयएस जगभरात एक क्रांतिकारी दहशतवादी समुहाप्रमाणे काम करत आहे, असे कॅलिस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, अल-कायदापासून फारकत घेतल्यानंतर या दहशतवाद्यांनी इतर संघटनांना दुर्बळ केले आणि आपले स्थान मजबूत करत आहे. आयएसआयएस एक दहशतवादी नेटवर्क एक लष्‍करी शक्तीप्रमाणे काम करत आहे, असे इन्स्टीट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर ( आयएसडब्ल्यू)चे जॉन लॉरेन्स यांनी स्पष्‍ट केले. आयएसआयएसबाबत अनेक मिथके प्रचलित आहेत. त्यापैकी सहा मिथकांविषयी जाणून घ्‍या..
पहिले मिथक : आयएसआयएस एक सीरियन विद्रोही समुह आहे..
आयएसआयएस या दहशतवादी गटाचा सीरियातील बशर अल-असद सरकारला विरोध आहे. परंतु त्यास सीरियन बंडखोर गट असे नाव देणे योग्य नाही. कारण ती एक आंतरराष्‍ट्रीय संघटना आहे. त्याची मुळे कोणत्याही एका देशात नाही. संघटनेत वेगवेगळ्या देशातील नागरिकही सामील झाली आहेत. दुसरे असे की, अनेक वर्षांपूर्वी अल-कायदा एकच संघटना होती. पण त्यातून आयएसआयएसही दहशतवादी संघटना स्थापन झाली.

पुढील स्लाइडवर वाचा इतर पाच मिथके...