आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांत 6,000 बाहुल्या, अडीच कोटी खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूरमध्ये राहणा-या 33 वर्षांच्या जियान यांग यांना बाहुल्यांचे प्रचंड वेड आहे. मागील 20 वर्षांमध्ये त्यांनी 6 हजारांहून अधिक बाहुल्यांचा संग्रह केला आहे. त्यांच्या खोलीतील तीन भिंती, 9 शोकेस आणि कपाटे बाहुल्यांनी खचाखच भरली आहेत. यांग यांनी तेराव्या वर्षीपासून बाहुल्यांचा संग्रह करण्यास सुरुवात केली होती. या संग्रहात बहुतांश बार्बी डॉल्स आहेत. या बाहुल्या खरेदी करण्यासाठी त्याने 2.60 कोटी रुपये खर्च केले आहेत. या सर्व बाहुल्या त्यांनी बैठकीत सजवून ठेवल्या आहेत. बैठकीतील जमीनही बार्बीचे वैशिष्ट्य असलेल्या पँटॉन 219 सी पिंक रंगाने रंगवली आहे. कुटुंबीयांनाही आता हा प्रकार अंगवळणी पडला आहे. यांग यांचे बाहुल्या खरेदी करण्याचे वेड इथवरच थांबले नाही. नुकतेच न्यूयॉर्क दौ-यावरून परतताना त्यांनी 65 बाहुल्या खरेदी केल्या आहेत.
msn.com