आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : मेटल कारखान्यात स्फोट; 65 ठार, 100 हून अधिक जखमी असल्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - पूर्व चीनच्या एका मेटल कारखान्यात झालेल्या स्फोटात 65 जण ठार झाले आहेत. चायनीज स्टेट मीडियाच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत 100 हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जिआंग्सू प्रांताच्या पूर्वेला असणा-या कुंशान शहरात हा कारखाना आहे.

स्टेट ब्रॉडकास्टर चाइना सेंट्रल टेलिव्हिजन (सीसीटीवी) ने एका ऑनलाइन पोस्टमध्ये याबाबात माहिती दिली आहे. रिम पॉलिश करणा-या या कारखान्यात शनिवारी सकाळी हा स्फोट झाल्याचे म्हटले आहेत. तसेच स्फोटाची कारणे शोधली जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सीसीटीवीवरील वृत्तात दाखवण्यात आलेल्या दृश्यांमध्ये कारखान्यातून निघणारे आगीचे आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर दिसत होते. एका प्रत्यक्षदरशीने चीनच्या सोशल नेटवर्किंग वेबसाइट वीबो पर या अपघातात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे म्हटले आहे. कारखान्याचे स्थान शोधणेही अवघड झाल्याचेही म्हटले आहे.
चाइना स्टेट मीडियाच्या वृत्तानुसार स्फोटाच्या वेळी कारखान्यात 200 हून अधिक कर्मचारी काम करत होते. त्यापैकी 40 कर्मचा-यांचा जागीच मृत्यू झाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा घटनेनंतरची काही छायाचित्रे...