आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्जेरियात 650 अपहृतांची सुटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्जीयर्स - आफ्रिकी देश अल्जेरियामध्ये अतिरेक्यांनी ओलिस ठेवलेल्या 650 जणांची सुटका करण्यात आली आहे. तिगनतुरिन गॅसफिल्डमध्ये त्यांना ओलिस ठेवले होते. मात्र, त्यातील 60 विदेशी नागरिकांचा तिस-या दिवशी कोणताही ठावठिकाणा लागला नाही. यामध्ये नॉर्वेच्या आठ आणि जपानच्या 14 लोकांचा समावेश आहे.

अल्जेरियाच्या विशेष लष्कराने शुक्रवारी गॅसफिल्ड सलग तिस-या दिवशी हल्ला चढवला आणि ओलिसांची सुटका केली. गुरुवारी अशाच एका हल्ल्यात 30 ओलिस आणि 11 अतिरेकी ठार झाले होते. मृतांमध्ये ब्रिटन व जपानचे प्रत्येकी दोन, फ्रान्सचा एक आणि अल्जेरियातील आठ नागरिकांचा समावेश होता. 17 अन्य देशातील नागरिक होते.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, काही ओलिस अद्यापही अतिरेक्यांच्या ताब्यात आहेत. लष्कराने संपूर्ण तेल शुद्धीकरण केंद्राला घेरले आहे. उत्तर मालीमध्ये फ्रान्सच्या कारवाईविरोधात विदेशींना ओलिस ठेवण्यात आल्याचा दावा अतिरेक्यांनी केला आहे. यामध्ये अमेरिका, फ्रान्सच्या नागरिकांचाही समावेश आहे. मात्र, त्यांच्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे यांचा दौरा रद्द: अल्जेरियातील सद्य:स्थितीमुळे जपानचे पंतप्रधान शिजो
अ‍ॅबे यांनी दक्षिण पूर्व आशियाचा दौरा रद्द केला आहे.
संकटाचा परिणाम
उत्तर मालीमध्ये अल कायदाविरुद्ध लष्करी कारवाई करणारे फ्रान्स आता द्विधा अवस्थेत सापडले आहे. अल कायदा अतिरेक्यांनी अल्जेरियामध्ये फ्रेंच नागरिकांना ओलिस ठेवले आहे. अल्जेरिया प्रमुख तेल निर्यातदार देश आहे. मात्र, तेथील तेल शुद्धीकरण केंद्र अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहेत. यामुळे तेल संकट ओढावू शकते.