आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील वैद्यकीय लाच प्रकरणात 7 भारतीयांची नावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- अमेरिकेतील लाखो रुपयांच्या लाच प्रकरणात भारतीय वंशाच्या सात नागरिकांचा समावेश असल्याचा दावा तपास अधिकार्‍यांनी केला आहे.

सर्वेश धारायन, संजय गुप्ता, वेंकट अटलरी, रंगराजन कुमार, वदन कुमार कोपाले, दारिन सिरिआनी अशी भारतीय-अमेरिकींची नावे आहेत. त्यांच्यावर लाच दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भारतीयांवरील आरोप सिद्ध झाले तर अमेरिकेच्या कायद्यानुसार त्यांना 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती न्यूयॉर्कच्या अटोर्नी प्रीत भारारा यांनी दिली. न्यूयॉर्क कंपनीत उच्च पदावर असलेले अनिल सिंग व केथ बुश यांच्या मदतीने कंपनीची कामे मिळावीत, यासाठी त्यांना लाच देण्यात आली. वैद्यकीय व्यवस्थापनविषयक सेवा देण्याचे काम न्यूयॉर्क कंपनीमार्फत देशभर चालते. त्याची कंत्राटे देताना सिंग व बुश आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले आहे. न्यायालयात त्यांच्या विरुद्ध दोष सिद्ध झाले तर सात भारतीयांना किमान 5 तर कमाल 20 वर्षांची कैद होऊ शकते.