आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Feared Dead In Attack On Shia Procession In Pakistan

पाकिस्तानमध्ये स्फोटात ८ ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुल्तान - पूर्व पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका धार्मिक स्थळी झालेल्या बॉम्बस्फोटात ८ जण जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर १२ ते १५ लोक जखमी झाले आहेत.
पंजाब प्रांतातील खानपूर या गावात रविवारी एका धार्मिक कार्यक्रमात बॉम्बस्फोट झाला. धार्मिक कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच याठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यानंतर हा स्फोट घडवून आणण्यात आला. धार्मिक ठिकाणी १५० पेक्षा जास्त लोक जमा झाले होते. याबाबत माहिती देताना स्थानिक पोलिस प्रमुख झहीर अबीद कादरी यांनी शार्टसर्किटमुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले. तेथे जवळच ट्रान्सफॉर्मर असल्याने मोठा स्फोट झाला. हा दहशतवादी हल्ल्याचा प्रकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.