आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Soldiers Among 20 Killed In Taliban Attack On Pak Check Post

पाकच्‍या लष्‍करी तळावर दहशतवादी हल्‍ला, 12 दहशतवाद्यांसह 8 सैनिक ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- वायव्य पाकिस्तानमध्‍ये पाकिस्‍तानच्‍या एका लष्करी तळावर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्‍या हल्‍ल्‍यात 8 सैनिक ठार झाले. तर 12 दहशतवाद्यांचाही खात्‍मा करण्‍यात आला. सैनिकांनी हा हल्‍ला उधळून लावला.

खैबर प्रांतात लक्‍की मारवा जिल्‍ह्यात सेराई नोरंग येथे हा लष्‍करी तळ आहे. प्राप्‍त माहितीनुसार, पहाटे 3.45 च्‍या सुमारास दहशतवाद्यांनी अत्‍याधुनिक शस्‍त्रांसह हल्‍ला चढविला. काही दहशतवादी आत्‍मघातकी जॅकेट्स घालून होते. या हल्‍ल्‍यात 12 दहशतवादी ठार झाले. त्‍यापैकी 4 जण आत्‍मघातकी पथकातील दहशतवादी होते.

तेहरिक-ए-तालिबानने हल्‍ल्‍याची जबाबदारी घेतली आहे. काल वायव्य पाकिस्तानमधील शिया मुस्लिमांच्या मशिदीवर काल झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 23 नागरिक मृत्युमुखी पडले होते. तर 50 जखमी झाले होते. हा हल्‍लादेखील तालिबानने घडविला होता. अमेरिकेच्‍या ड्रोन हल्‍ल्‍यात तालिबानचे दोन कमांडर मारल्‍या गेले होते. त्‍याचा बदला म्‍हणून हे हल्‍ले होते. पाकिस्‍तानी सैन्‍याकडून ड्रोन हल्‍ल्‍यांना सहकार्य होते. त्‍याविरोधात पाकिस्‍तानी लष्‍करी तळांना लक्ष्‍य करण्‍यात येत आहे.