आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 800,000 Red Poppies Pour Like Blood From The Tower Of London

सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘टॉवर ऑफ लंडन’ परिसर रक्तवर्णी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पहिल्या महायुद्धामध्ये असंख्य नागरिक व सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ येथील ऐतिहासिक लंडन टॉवर परिसरात पॉपी नावाच्या लालभडक फुलांची सजावट करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. ‘युद्धाच्या रक्तरंजित स्मृतींचा लालबुंद सागर’ या संकल्पनेवर फुलांची सजावट केली जात आहे.

सिरॅमिकची फुले
सिरॅमिक फुले हिरवळीवर लावण्यासाठी अनेक स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत आहेत. गेल्या महिन्यापासून हा उपक्रम सुरू आहे.

डिझायनरची मदत
कलावंत पॉप कुमिन्स आणि थिएटर स्टेज डिझायनर टॉम पिपर यांनी त्याची रचना निश्चित केली आहे. त्यांच्या मदतीने फुलांची रचना करण्यात आली आहे.