आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 81 Shiat Muslims Killed In Suicide Blast In Pakistan City Quetta

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्‍तानात भीषण बॉम्‍बस्‍फोटात 81 जणांचा मृत्‍यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानातील क्‍वेटा शहरात शनिवारी रात्री आत्‍मघातकी बॉम्‍बस्‍फोटात 81 जणांचा मृत्‍यू झाला आहे. गेल्‍या काही महिन्‍यांमधील हा सर्वात भीषण आत्‍मघातकी स्‍फोटांपैकी एक आहे. हल्‍लेखोरांनी शियाबहुल भागाला लक्ष्‍य केले. हजारा टाऊनशिपमध्‍ये किराणा मार्गावर गर्दीच्‍या ठिकाणी स्‍वतःला स्‍फोटाने उडवून लावले. बाजारपेठेचा हा भाग असल्‍यामुळे गर्दी होती. त्‍यामुळे अनेकांचा मृत्‍यू झाला. काल स्‍फोट झाला त्‍यावेळी 63 जणांचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला होता. त्‍यानंतर अनेक जणांचा रुग्‍णालयात मृत्‍यू झाला. अजुनही सुमारे 150 जखमींवर रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत. क्‍वेटा बलुचिस्‍तानची राजधानी आहे. इराण आणि अफगाणिस्‍तानची सीमा येथून जवळ आहे.

गेल्‍या महिन्‍यात पाकिस्‍तानमध्‍ये आत्‍मघातकी स्‍फोटात 92 जणांचा मृत्‍यू झाला होता. त्‍या स्‍फोटाची जबादबारी लष्‍कर-ए-झांगवी या दहशतवादी संघटनेने घेतली होती. याच संघटनेने काल झालेल्‍या स्‍फोटाची जबाबदारी घेतली आहे.