आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 82 Years Old Man Last Will To Buried With His Bike

अमेरिकेतील 82 वर्षीय व्यक्तीची अजब अंतिम इच्छा, आवडत्या बाइकसह हवी दफनविधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेकानिसबर्ग - मोटारसायकलचे वेड आयुष्यभर जपणा-या एका व्यक्तीवर त्याच्या आवडत्या हर्ली-डेव्हिड मोटारसायकलसह अंत्यविधी करण्यात आला. तोही गाडीवर स्वार असलेल्या स्थितीमध्ये ! जगावेगळा अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीचे नाव बिली स्टँडली असून हार्ली-डेव्हिडसन गाडीवर त्याचे नितांत प्रेम होते. त्यांना गाडीसह शवपेटीत ठेवून शुक्रवारी दफन करण्यात आले. ते 82 वर्षांचे होते. फु प्फुसाच्या कर्करोगाने त्यांचा गेल्या रविवारी मृत्यू झाला. वास्तविक गाडीसह पार्थिव ठेवण्यासाठी आवश्यक असणारी शवपेटी तयार करणे हे कठीण काम होते. दुचाकी 1967 चे मॉडेल होते.
पार्थिवासोबत लोखंडी वस्तूला दफन करायचे होते. गाडीवर स्वार असलेल्या स्थितीत ठेवून हा विधी करणे सोपे काम नव्हते. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून त्यांनी याची तयारी करण्यास मुलांना सांगितले होते. त्यांच्या दोन मुलांनी वडिलांची आज्ञा मानून मोठ्या आकारातील काचेची शवपेटी तयार करून ठेवली होती. दरम्यान, मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांची शवपेटी पूर्ण तयार करण्यात आली. स्टँडली यांचे मोटारसायकलवरील प्रेम म्हणजे वेडेपणापुरते मर्यादित नव्हते. मोटारसायकलच्या रायडिंगमधून स्टँडली यांच्यातील धाडसीपणा नेहमी जाणवायचा, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
स्टँडली यांच्या वागण्यात काहीसा विचित्रपणा दिसून येत असे. त्यांनी स्वत:साठी जशी शवपेटीची तयारी केली होती, तशाच आणखी तीन शवपेट्याही तयार करण्यासाठी टाकल्या होत्या. पत्नी लॉर्ना आणि दोन मुले पिट, रॉय यांच्यासाठी ही तयारी होती. विशेष म्हणजे मृत्यूचाही उत्सव साजरा करणा-या स्टँडली यांनी तीन शवपेट्यांची त्यांच्या सूचनेप्रमाणे सजावट केली होती.
अखेरचा प्रवास नेहमीच्या स्टाइलमध्ये
डोळेबंद अवस्थेत मोठ्या बाइकवर स्वार असलेल्या स्टँडली यांचे शवपेटीतील छायाचित्र अमेरिकी वृत्तपत्रांतून प्रकाशित झाले. काळ्या लेदरचे कपडे, पांढरे हेल्मेट ,गॉगल, हातमोजे, हँडबार्स अशा पोशाखात स्टँडली यांनी अखेरचा प्रवास केला.
ते अफलातून होते !
दुचाकीवरून केवळ स्वर्गात जाणार नाही, तर शवपेटीतून जगाने माझ्याकडे उदात्तपणे पाहावे, असे वडिलांना वाटायचे. ते अफलातून व्यक्ती होते. -डॉरोथी ब्राऊन, मुलगी