आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जगातील अर्धी संपत्ती आहे फक्‍त 85 श्रीमंतांकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दावोस- जगातील एकूण संपत्‍तीपैकी अर्धी संपत्‍ती 30 देशातील 85 श्रीमंतांकडे आहे, या बातमीवर आपला विश्‍वास बसणार नाही. परंतु 'जागतिक आर्थिक मंच' च्‍या बैठकीमध्‍ये विकास संघटनेच्‍या 'वर्किंग फॉर द फ्यू' च्‍या अहवालामध्‍ये ही माहिती सादर करण्यात आली आहे. या अहवालामध्‍ये विकसित आणि विकसनशिल राष्‍ट्रातील वाढती विषमता याबद्दल चिंता व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे.

जगातील गर्भश्रीमंतांनी आपल्‍या आर्थिक फायद्यासाठी लोकशाहीला वेठीस धरले आहे. आपल्‍या आर्थिक फायद्यासाठी राजकारणाचा मार्ग स्‍वीकारला आहे्.

1970 पासून आकारल्‍या जाणा-या करामध्‍ये 30 पैकी 29 देशामध्‍ये गर्भश्रीमंतांडून अपेक्षीत असणारा 'कर' वसूल केला जात नसल्‍यामुळे काही ठरविक लोकांकडेच संपत्‍ती एकवटली आहे. जगातील 46 टक्‍के लोकांच्‍या संपत्‍तीपेक्षा या 85 गर्भश्रीमंतांची संपत्‍ती जास्‍त आहे.

ऑक्‍सफॅमचे कार्यकारी संचालक, विनी बयानयिमा यांनी संपत्‍तीच्‍या केंद्रीकरणाद्दल चिंता व्‍यक्‍त केली आहे.


पुढील स्‍लाईडवर वाचा जगातील सर्वात श्रीमंत व्‍यक्तिबद्दल ......