Home »International »Other Country» 90 Year Old Man Married To 15 Year Old Girl

90 वर्षांचा नवरा, 15 वर्षांची नवरी; सौदी अरबमध्‍ये झालेल्‍या विवाहावरुन गदारोळ

वृत्तसंस्‍था | Jan 08, 2013, 11:55 AM IST

सौदी अरेबियाच्या एका 90 वर्र्षांच्या जख्खड म्हातार्‍याने सुमारे दहा लाख रुपयांचा हुंडा देऊन 15 वर्षीय मुलीशी निकाह केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या धाडसी मुलीने अरबी म्हातार्‍याला कोंडून घरातून पळ काढला.
बाल-जरठ विवाहाच्या या घटनेमुळे दुबईत संतापाची लाट उसळली आहे. मानवी हक्क संघटना आणि सोशल मीडियावर त्याविरोधात निषेधाचे सूर उमटले आहेत. घाबरलेल्या या मुलीने आतली कडी लावून घेत त्या म्हातार्‍याला बेडरूममध्ये पाऊल ठेवू दिले नाही. सतत दोन दिवस कोंडून घेतल्यानंतर या बालवधुने वेळ साधून म्हातार्‍या नवर्‍याच्या घरातून अखेर पळ काढला व ती थेट आई-वडिलांच्या घरी आली, असे वृत्त अल-अरेबिया वृत्तपत्राने दिले आहे.
दरम्यान, वयोवृद्ध नवरोबाने आपला निकाह कायदेशीर असल्याचा दावा केला आहे. मुलीसोबत निकाह करण्यासाठी आपण 17500 डॉलर्सची (सुमारे 9 लाख 67 हजार रुपये ) बिदागी तिच्या आई-वडिलांना दिली होती. असा दावा त्याने केला आहे. मुलीचे वडील येमेनी असून आई सौदी अरेबियाची आहे. भारत असो की दुबई बाल-जरठ विवाहाचे दुष्परिणाम माहीत असूनही असे विवाह लावून देणार्‍यांना व नवरदेव म्हातार्‍यांना या घटनेने एक चपराक बसली आहे.
न्यायालयात खेचण्याची धमकी- मुलगी नांदवण्यासाठी परत पाठवा किंवा पैसे परत करा अन्यथा न्यायालयात खेचण्याची धमकी म्हातार्‍या नवर्‍याने दिली आहे. सौदी अरेबियाच्या मानवी हक्क संघटनेच्या सदस्य सुहैला झेन एल अबेदीन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. लवकरात लवकर कारवाई करून मुलीची दुर्दैवाच्या फेर्‍यातून सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Next Article

Recommended