आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडात जगातील सर्वात उंच लाकडाची 18 मजली इमारत, पाहा सुंदर फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडात लाकडाने बनवलेली टॉल वूड बिल्डिंग... - Divya Marathi
कॅनडात लाकडाने बनवलेली टॉल वूड बिल्डिंग...
व्हॅकुव्हर- कॅनडामध्ये 18 मजली लाकडी इमारत बांधण्यात आली आहे. 'टॉल वूड बिल्डिंग' असे हिचे नाव असून तिची उंची 174 फूट आहे. ही जगातील सर्वात उंच लाकडी इमारत आहे. हिच्या निर्मितीला 11 महिने लागले. यासाठी 343 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली. यात ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाचे 400 विद्यार्थी सप्टेंबर 2017 मध्ये निवासासाठी येतील. यापूर्वी नॉर्वेमध्ये सर्वात उंच लाकडी इमारत बांधली गेली. नॉर्वेच्या बार्गेनमध्ये 14 मजली इमारत बांधण्यात आली होती. आग लागली तरी लाकूड जळणार नाही...

- ही लाकडी इमारत 18 मजली असून तिची एकून उंची 174 फूट आहे.
- एक मजली काँक्रीटच्या पायावर दोन काँक्रीट पिलर्स बनवले गेले.
- त्यानंतर लाकडी पार्टिशनला जोडून इमारत उभारली गेली.
- इमारतीतील फरशा लॅमिनेटेड लाकडाच्या आहेत.
- लाकडी बांधणी मजबूत असून आग लागली तरी लाकूड जळणार नाही.
- या इमारतीत 400 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात येणार आहे.

लाकडाच्या वापरामुळे पर्यावरणपूरक इमारत-
- 500 कार करतील इतक्या प्रदूषणापासून बचाव झाला आहे.
- लाकडाच्या वापरामुळे काँक्रीटच्या तुलनेत 2432 मेट्रिक टन कमी कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होईल.
- 500 कारमुळे वर्षात इतके प्रदूषण होते.
- या इमारतीसाठी सुमारे 2,233 क्यूबिक मीटर लाकडाचा वापर केला गेला आहे.
- इतके लाकूड अमेरिका- कॅनडाच्या जंगलात 6 मिनिटांत उगवते.
- 11 महिन्यांत बांधलेली ही लाकडी 18 मजली इमारत सध्या जगातील सर्वात उंच ठरली आहे. यासाठी 343 कोटी रुपये खर्च आला आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहूया, या इमारतीचे शानदार फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...