आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9/11: हल्ल्यानंतर गुर्मीत वावरणारे बुश यांचा चेहरा कानफटात मारल्यासारखा पडला होता...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेवर झालेल्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्याला सोमवारी 16 वर्षे पूर्ण झाली. 11 सप्टेंबर 2001 रोजी सकाळी 9- सव्वानऊच्या सुमारास हल्ला झाला होता. त्यानंतर तासाभरानंतर व्हाइट हाऊसमधील वातावरण अतिशय विदारक झाले होते. प्रचंड गुर्मीत वावरणाऱ्या अमेरिकी राजकारण्यांचे चेहरे कानाखाली जाळ काढल्याप्रमाणे पडले होते. हे वास्तव मांडणारे फोटो बाहेर आले आहेत. यात अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश, नॅशनल सेक्युरिटी अॅडव्हाझर कोंडोलिना राईस, तत्कालिन उपाध्यक्ष डिक चेनी आदी दिसतात. डिक चेनी यांच्या स्टाफ फोटोग्राफरने हे फोटो घेतले आहेत. अमेरिकेच्या नॅशनल आर्काइव्हने हे फोटो जाहीर केले आहेत.
 
काय आहे फोटोत- 
 
- दहशतवादी हल्ला झाला तेव्हा डिक चेनी व्हाईट हाऊसच्या हायली सेफ बेसमेंटमध्ये पत्नीसह घटनेच्या बातम्या बघत होते. 
- बूश फ्लोरिडातील एका शाळेच्या कार्यक्रमात गेले होते. माहिती मिळाल्यावर ते लगेच व्हाईट हाऊसमध्ये आले. त्यानंतर ते अध्यक्षांच्या इर्मजन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये गेले. हे सेंटर व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगखाली एका बंकरमध्ये आहे. अणूबॉम्ब आणि इतर हल्ल्यांपासून ते पूर्णतः सुरक्षित आहे.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, व्हाइट हाऊसमधील हे फोटो....
बातम्या आणखी आहेत...