आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 Million German Women Raped, Mass Sexual Harassment By Soviet And Allied Soldiers

FACTS: 20 लाख महिलांवर Rape, जन्माला आली 4 लाख अनौरस मुले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात विध्वंसक अशा दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा अत्याचार साऱ्या जगाने पाहिला. 1 सप्टेंबर 1939 ते 1945 पर्यंत चाललेल्या या युद्धात हिटलरच्या नाझीवादी सैनिकांनी साऱ्या जगात तांडव मांडला होता. त्याचा फटका जर्मनीच्या सामान्य जनतेलाच बसला. 1944 मध्ये सोव्हिएत रशियाने सर्वप्रथम जर्मनीच्या शहारांवर ताबा मिळवला. यासोबतच सहकारी राष्ट्र अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या सैनिकांनी सुद्धा जर्मनीची शहरे काबिज केली. यानंतर याच सैनिकांनी तेथील जर्मन महिलांवर अमानवीय अत्याचार सुरू केले. वाट्टेल त्या महिलेला रस्त्यात धरून तिच्या अब्रूचे धिंडवडे काढणे आणि नकार दिल्यास गोळ्या झाडण्याचे प्रकार रोजचेच झाले होते.

 

> इतिहास तज्ञांच्या मते, रेड आर्मीच्या वासनांध सैनिकांनी जर्मनीच्या 20 लाख महिलांवर बलात्कार केला. 
> रेड आर्मी आणि सहकाऱ्यांनी केलेला हा बलात्कार इतिहासातील सर्वात मोठा सामुहिक लैंगिक अत्याचार म्हटला जातो. 
> लेखक अॅण्टोनी बीव्हर यांनी 'फॉल ऑफ बर्लिन' या पुस्तकात हा दावा केला. त्यानुसार, रेड आर्मीचे सैनिक कुठल्याही जर्मन महिलेला सोडत नव्हते.
> रेड आर्मीने अवघ्या 8 वर्षांच्या बालिकांपासून 80 वर्षांच्या वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांवर बलात्कार केला.
> स्थानिक रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, सहा महिन्यात केवळ बर्लिन शहरात 1 लाख महिलांवर लैंगिक अत्याचार झाले.

 

पुढील स्लाइड्सवर, दिसेल त्या महिलेला पकडायचे, विरोध करणाऱ्यांना घालायचे गोळ्या...

बातम्या आणखी आहेत...