Home | International | Bhaskar Gyan | deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

असा झाला स्रमाट अशोक, अकबर, सिकंदर व स्वामी विवेकानंदांसह या 10 महापुरुषांचा मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 05, 2018, 12:42 PM IST

कसा झाला या महान व्यक्तींचा मृत्यू हे आपण जाणून घेऊ...

 • deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

  इंटरनॅशनल डेस्क - जगज्जेता सिकंदर, सम्राट अशोक, सम्राट अकबर आणि स्वामी विवेकानंद यांच्यासह संत कबीर दास इतिहासात कधीच विसरता येणार नाहीत अशा मोजक्या नावांपैकी एक आहेत. ज्यांच्या जगण्याच्या प्रत्येक दिवसाचे वर्णन एक महान ग्रंथ ठरू शकते. या महान आत्म्यांनी जगाला आपल्या विचारांनी जगणे आणि हक्कांसाठी लढणे शिकवले. या महात्म्यांचे जगणे जितके महान होते तितकेच त्यांच्या मरणाचे फॅक्ट्स रंजक आहेत. कसा झाला या महान व्यक्तींचा मृत्यू हे आपण जाणून घेऊ...

  पुढील स्लाइड्सवर वाचा, असा झाला सिकंदरासह स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू...

 • deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

  सिकंदराच्या गुरूचे गुरू सॉक्रेटिस

  जगज्जेता स्रमाट सिकंदरचे गुरू अॅरिस्टॉटल आणि त्यांचेही गुरू इतिहासातील सर्वात महान विचारवंतांपैकी एक प्लेटो यांचेही सॉक्रेटिस गुरू होते. त्यांच्या विचारांमध्ये इतकी ताकद होती की अॅथेन्स आणि जगभरातील युवक त्यांचे चाहते होते. प्लेटोने आपल्या सीक्रेट पुस्तकात सॉक्रेटिस यांच्या लोकप्रियतेने सरकार चिंतीत झाले. त्यांच्यावर युवकांना भडकावण्याचे आरोप लागले. यानंतर त्यांना तुरुंगात डांबून विष प्रयोग करून मारण्यात आले.

 • deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

  सिकंदरचे गुरू अॅरिस्टॉटल

  जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वी अर्थात इसपू 384 मध्ये आजच्या ग्रीस येथे अॅरिस्टॉटल यांचा जन्म झाला. प्लेटो त्यांचे गुरू होते. गणित आणि अभियांत्रिकीसह खगोल आणि भूगर्भशास्त्रासह प्रत्येक बाबीचा अभ्यास आणि ते सांगण्याच्या पद्धतीसाठी ते ओळखले जात होते. इसपू 322 मध्ये ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला. 

 • deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

  चाणक्य

  चाणक्य यांच्या मागे किंवा पुढे महान राजकीय विचारवंत असे लावण्याची गरजच नाही. मुळात महान राजकीय विचारवंताचा समानार्थी शब्द म्हणजेच चाणक्य असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजही सोशल मीडियावर लोक आपले कुठलेही विचार लिहून त्याखाली चाणक्य असे लिहून व्हायरल करतात. त्यांचे शेवटचे क्षण काही खास नव्हते. चंद्रगुप्त यांचा मुलगा बिंदूसार राजा झाले तेव्हा त्यांच्या दरबारात सुबंधू हा मंत्री होता. त्याने द्वेषापोटी राजाला चाणक्य विरोधात भडकावले. बिंदूसार यांच्या आईचा मृत्यू चाणक्यमुळे झाल्याचे सांगितले. बिंदूसार यांनी पडताळणी न करता मान्य केले. राजा आपल्यावर क्रोधित असल्याचे कळताच चाणक्य घर सोडून जंगलात निघाले. राजाला आपली चूक कळाली. ते चाणक्य यांची समजूत काढण्यासाठी जंगलातही गेले. पण, काहीच ऐकण्यास तयार नसलेले चाणक्य यांनी अन्नत्याग केला व देह सोडले.

 • deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

  सम्राट अशोक

  40 वर्षे राज्य करून एकानंतर एक राज्य, प्रांत आणि देश काबिज करणाऱ्या सम्राट अशोक युद्धांसाठीच प्रसिद्ध होते. युद्ध, संघर्ष, रक्तपात करून त्यांनी इतके मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. पण, कलिंगाच्या युद्धातील रक्तपात पाहून त्यांच्या मनात युद्धाविषयी घृणा निर्माण झाली. यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. सन्यास घेऊन जंगलात असताना काही वर्षांनंतर त्यांचा जंगलातच मृत्यू झाला. 

 • deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

  जगज्जेता सिकंदर

  सिकंदरला विश्व विजेता असेही म्हटले जाते. त्याने अगदी कमी वयात पृथ्वीच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवला होता. भारतात घुसला तेव्हा त्याचा सामना पोरसशी झाला. राजा पोरस सिकंदर विरोधात पुरून उरला. मात्र, त्याचाच एक भेदी आंभीने त्याला दगा दिला. पोरस अडकल्यानंतर सिकंदराने त्याला शेवटची इच्छा विचारली. त्यावर एक राजा दुसऱ्या राजासोबत कसा व्यवहार करतो तेच हवे असे पोरस म्हणाला. यावरूनच सिकंदर खुश झाला आणि त्याने पोरसचे राज्य परत केले. तेव्हापासूनच दोघे एकमेकांचे मित्र झाले. वयाच्या 32 व्या वर्षी सिकंदरला अती अल्कोहोल आणि त्यानंतर आलेल्या तापीने सिकंदरचा जीव घेतला. 

 • deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

  सम्राट अकबर

  मोगल साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध असा बादशहा आणि सम्राट म्हणून अकबरला ओळखले जाते. आपल्या राजवटीत त्याने साऱ्या जनतेला धार्मिक स्वातंत्र्य दिले होते. प्रजेच्या मदतीसाठी अकबर नेहमीच सज्ज होते. जनतेमध्ये सामान्य वेशात जाऊन ते जनतेच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घ्यायचे. कित्येक युद्ध जिंकले, राज्य मिळवले. वयाच्या ऑक्टोबर 1605 मध्ये वयाच्या 63 व्या वर्षी पोटाच्या विकारामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

 • deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

  बीरबल

  अकबर बीरबलचे किस्से लहानपणी सर्वांनीच ऐकले असतील. गमतीचे विषय असो वा गंभीर प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी अकबराला बीरबलचीच आठवण यायची. सिंधू नदीवर अफगाणच्या आदिवासींनी बंडखोरी केली होती. त्यावेळी सेनापती झैन खान कोका यांच्यासोबत अकबराने त्यांना लढण्यासाठी पाठवले. सेनापतीचे बीरबलशी वैर होते. त्याने वेगळी तुकडी घेऊन लढण्यास सुरुवात केली. लढणे येत नसल्याने बीरबलचा मृत्यू झाला. अकबरने बीरबलच्या मृत्यूनंतर दोन दिवस अन्नत्याग केला होता. 

 • deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

  संत कबीर दास

  कबीर दास आपल्या पिढीतील क्रांतिकारी होते. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते. तरीही त्यांनी म्हटलेले एक-एक वाक्य लोकांनी लिहून ठेवले आहेत. त्यांचा एक-एक शब्द ढोंगींच्या कानात जखम करायचा. काशीत मरणाऱ्यांना स्वर्ग मिळते असे सर्वांचे म्हणणे होते. पण, ते मगहरला निघून गेले. त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समाज ते आपलेच होते असा दावा करतात. 

 • deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

  लियोनार्डो दा विंची

  शाळेत पायही नाही ठेवणारे लियोनार्डो दा विंची आर्टिस्ट, इंजीनियर, गणितज्ञ आणि वैज्ञानिक होते. हेलिकॉप्टरचे डिझाईन असो वा सीक्रेट स्माइल करणारी मोनालिसा त्यांच्यात सर्वच गुण होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांना अर्धांगवायू झाला होता. 2 मे 1519 मध्ये 67 वर्षांचे असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

 • deaths of the worlds greatest personalities including swami vivekanand akbar ashok and kabir

  स्वामी विवेकानंद

  हिंदुत्वाला नव्या पद्धतीने लोकांसमोर मांडणारे स्वामी विवेकानंद आजही करोडो युवकांसाठी नायक आहेत. शिकागो येथे 1893 मध्ये त्यांनी सर्वधर्मीय संमेलनात भाषणाची सुरुवात 'भगिणींनो आणि बंधूंनो' अशी भाषणाला सुरुवात केली. त्यांचे ते भाषण ऐतिहासिक ठरले. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी 4 जुलै 1902 रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.

Trending