Home | International | Bhaskar Gyan | Elon Musks spacex company Launched First Falcon Heavy rocket & future leaving graphics

मानवाचे 100 वर्षांनंतर असे असेल पृथ्वीवरील जीवन, समुद्रात वस्ती तर मंगळावर पर्यटन!

दिव्यमराठी वेब टीम | Update - Feb 12, 2018, 10:33 AM IST

इलोन मस्क यांचे स्वप्न आहे ते चंद्रासह मंगळवार मानवी वस्ती करण्याचे.

 • Elon Musks spacex company Launched First Falcon Heavy rocket & future leaving graphics
  समुद्रातील संभाव्य बबल सिटी (ग्राफिक्स) ज्या समुद्रात कार्यरत असतील.

  इंटरनॅशनल डेस्क- विज्ञान कथा- कादंब-यांतील प्रगत जग वास्तवात आणण्यासाठी गेली काही वर्षे सातत्याने झपाटून काम करणारे इलोन मस्क यांच्या नेतृत्त्वाखालील चमूने जगातील पहिले खासगी यान नुकतेच अंतराळात पाठवले. इलोन मस्क जन्माने दक्षिण आफ्रिकी आहेत तर कर्माने पक्के उपक्रमशील अमेरिकन आहेत. इलोन मस्क यांचे स्वप्न आहे ते चंद्रासह मंगळवार मानवी वस्ती करण्याचे. याच महत्त्वकांक्षी प्रकल्पाचा टप्पा म्हणून मानले जाणारे जगातील सर्वात शक्तीशाली 'फाल्कन हेवी' रॉकेट अमेरिकेतील फ्लोरिडा भागातून अंतराळात गेले. त्यांची दिशा भरकटली पण म्हणून मस्क हे हार मानणा-यातील नाहीत. अशाच कल्पना शक्तीमुळे जगात पहिल्याद एका खासगी कंपनीने अंतराळ उ्डडाण यशस्वी केले. काय आहे 'फाल्कन हेवी' या यानाचे वैशिष्ट्ये....

  - इलोन मस्क यांच्या 'स्पेसएक्स' कंपनीने 'फाल्कन हेवी' हे प्रचंड शक्तीशाली अवकाश यान 6 फेब्रुवारी रोजी आकाशात सोडले.
  - हे अवकाश यान 23 मजली इमारतीएवढे ऊंच म्हणजेच 70 मीटर (230 फूट) ऊंच आहे.
  - या यानाचे वजन 141000 पौंड म्हणजेच 64 मेट्रिक टन इतके आहे.
  - या यानाचे वस्तुमान 737 जेटलायनर विमानांइतके आहे तर याला तब्बल 27 इंजिने जोडली आहेत.
  - मानवविरहित असलेल्या या अवकाश यानामुळे भविष्यात खासगी अवकाश कार्यक्रमांना वाट मोकळी झाली आहे.
  - या यानासोबतच इलोन मस्क यांची प्रतिमा असलेल्या चालकांसमवेत एक स्पोर्ट्स कार पाठवली आहे.
  - या रॉकेट उड्डाणाचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर इलोन मस्क यांनी त्यांच्या मोटारीचा व्हिडिओ टि्वटरवर टाकला.
  - सोबतच मस्क यांनी आपल्या स्पेस एक्सच्या सहा हजार कर्मचा-यांची नावे, विज्ञानकथा लेखक आयझॅक अॅसीमोव्हच्या तीन विज्ञान कादंब-या, स्टारमन रूपातील बाहुलीसह इतर माहिती या मोटारीत पाठवले आहे.

  कसे असेल 100 वर्षांनी पृथ्वीवरील जीवन-

  - काही शतकांमध्ये मानवाचे जीवन समुळ बदलणार आहे. तो केवळ चंद्र, मंगळ यांच्यासह इतर ग्रहांवर फक्त पर्यटनाला जाणार नाही तर समुद्राखाली पाण्यात घरे बांधणार आहे.
  - 'स्मार्टथिंग्स फ्यूचर लिव्हिंग' नावाच्या एका रिपोर्टमध्ये 100 वर्षांनी पृथ्वीवरील जीवन कसे असेल याची भविष्यवाणी करण्यात आली आहे.
  - आणखी 100 वर्षांनी म्हणजे 2118 मध्ये जवळपास सर्वच इमारती हायराईज असतील.
  - पाण्याच्या आत विशाल 'बबल सिटी' असतील. बबलच्या आत बहुमजली इमारती, शाळा, ऑफिस आणि पार्क राहतील.
  - समुद्राच्या पाण्यापासून ऑक्सिजन निर्मिती केली जाईल.

  ट्रॅव्हलिंगसाठी राहतील खासगी ड्रोन-

  - 100 वर्षांनी बहुसंख्य लोकांमध्ये खासगी ड्रोन असतील. बाहेर फिरायला जाताना घराला सोबत घेता येईल.
  - मंगळ आणि चंद्र जवळ भासू लागेल. लोक सुट्या एन्जॉय करण्यासाठी तेथे जातील.
  - लहान-मोठ्या आजारांसाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नसेल. घरीत मशीन तपासणी आणि उपचार करतील.
  - फर्निचरपासून जेवणापर्यंत सर्वकाही अॅडव्हान्स थ्रीडी प्रिंटरमध्ये तयार केले जाईल.
  - दररोज ऑफिसमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. घरी बसून काम करता येईल.
  - मानवांना जमिन कमी पडेल. त्यामुळे समुद्रात घरे तयार केली जातील.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, फाल्कन हेवीचे फोटोज व फ्युचर लिव्हिंगचे ग्राफिक्स....

 • Elon Musks spacex company Launched First Falcon Heavy rocket & future leaving graphics
  इलोन मस्क यांच्या 'स्पेसएक्स' कंपनीने 'फाल्कन हेवी' हे प्रचंड शक्तीशाली अवकाश यान 6 फेब्रुवारी रोजी आकाशात सोडले.
 • Elon Musks spacex company Launched First Falcon Heavy rocket & future leaving graphics
  हे अवकाश यान 23 मजली इमारतीएवढे ऊंच म्हणजेच 70 मीटर (230 फूट) ऊंच आहे.
 • Elon Musks spacex company Launched First Falcon Heavy rocket & future leaving graphics
  मानवविरहित असलेल्या या अवकाश यानामुळे भविष्यात खासगी अवकाश कार्यक्रमांना वाट मोकळी झाली आहे.
 • Elon Musks spacex company Launched First Falcon Heavy rocket & future leaving graphics
  या रॉकेट उड्डाणाचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर इलोन मस्क यांनी त्यांच्या मोटारीचा व्हिडिओ टि्वटरवर टाकला.
 • Elon Musks spacex company Launched First Falcon Heavy rocket & future leaving graphics
  बहुसंख्य इमारती मल्टिस्टोरी असतील.
 • Elon Musks spacex company Launched First Falcon Heavy rocket & future leaving graphics
  बाहेर जायचे असेल तर सोबत घरही ड्रोनच्या मदतीने नेता येईल.

  काही शतकांमध्ये मानवाचे जीवन समुळ बदलणार आहे. तो केवळ चंद्र, मंगळ यांच्यासह इतर ग्रहांवर फक्त पर्यटनाला जाणार नाही तर समुद्राखाली पाण्यात घरे बांधणार आहे. 

 • Elon Musks spacex company Launched First Falcon Heavy rocket & future leaving graphics
  चंद्र, मंगळावर लोक सुट्या एन्जॉय करतील.

Trending