आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त महिलांसाठी बनले आहे हे तुरुंग, फोटोग्राफरने टिपले Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ही छायाचित्रे इस्रायलमध्ये असलेल्या खास महिलांच्या तुरुंगातील आहेत. नर्वे त्रिजा असे या तुरुंगाचे नाव असून येथे 200 महिला कैद आहेत. त्यामध्ये 18 ते 70 वर्षीय महिलांचा समावेश आहे. तेल-अव्हीव येथील फोटोग्राफर तोमर इफराहने या तुरुंगातील काही फोटोज टिपले आहेत. 

 

> तोमर यांना 2011 मध्ये जेलमध्ये जाऊन पाहणी करण्याची संधी मिळाली होती. ती एका रिपोर्टरसोबत असाइनमेंटवर तेथे पोहचली होती. 
> तिचे खरे काम तेथील कैद्यांची एकट्याने फोटोज घेणे होते. मात्र, तिने तुरुंगात प्रवेश केल्यानंतर वेगळीच मोहिम सुरू केली. 
> तीन महीने दर आठवडा न चुकता तुरुंगात जाऊन तिने महिला कैद्यांसोहत वेळ घालवला. आणि त्या सगळ्यांचे फोटोज आपल्या कॅमेऱ्यात टिपले. 
> तोमरने सांगितल्याप्रमाणे, तेथे कैद महिला वेग-वेगळ्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आल्या. त्यापैकी बहुतांश महिला कैदी ह्या अल्पसंख्याक आहेत. 
> तुरुंगाचे वैशिष्ट्य म्हणजे, कैदेत असलेल्या महिला इस्रायली नाहीत. त्या प्रामुख्याने रशिया, इथियोपिया आणि दक्षिण अमेरिकेच्या आहेत.
> त्यातही अनेक महिला आपल्या गुन्ह्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा तुरुंगात आल्या आहेत. त्या सगळ्याच अतिशय छोट्या सेलमध्ये राहतात. 


माजी कैद्याने सांगितली होती परिस्थिती
- 1979 मध्ये कैदेत राहिलेली पॅलेस्टिनी मुस्लिम महिला रसमियाह ओदेहने तुरुंगातील परिस्थिती यूएनसमोर मांडली होती. तिने तुरुंगात चालणारे प्रकार मानवाधिकार समितीकडे सांगितले होते. 
- तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असतात. त्यामध्ये महिलांसह त्यांच्या चिमुकल्यांना देखील कैद केले जाते. अतिशय छोट्या अशा सेलमध्ये 6 महिलांना अक्षरशः कोंबले जाते. 
- संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळपर्यंत कुठल्याही महिलेला आपल्या सेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नाही. सगळेच गेट बंद ठेवले जातात. 
- फोटोग्राफरने सुद्धा ओदेहच्या आरोपांशी सहमती दर्शवली. हे तुरुंग कैद्यांना ठेवण्याच्या लायकीचे नाही. 
- ओदेहने सांगितल्याप्रमाणे, ज्यू आणि मुस्लिम वादांमुळे तुरुंगात मुस्लिम महिलांना नमाज आणि दुआची सुद्धा परवानगी दिली जात नाही. 
- शिक्षेच्या नावे येथे महिला कैद्यांना सुद्धा मारहाण केली जाते. त्यांच्यावर स्प्रे टाकून अत्याचार केला जातो. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या तुरुंगाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...