Home | International | Bhaskar Gyan | stewart gilchrist popular touchy feelest hot yoga class in Britain

ब्रिटनमधील हा योग गुरू शिकवतो 'हॉट योगा', वर्षातून एकदाच अंघोळ ती पण समुद्रात!

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jan 30, 2018, 10:16 AM IST

मागील आठवड्यात जागतिक सुर्यनमस्कार दिन (24 जानेवारी) जगभर साजरा करण्यात आला.

 • stewart gilchrist popular touchy feelest hot yoga class in Britain
  एका तरूणीला योगा शिकवताना स्टीवर्ट गिलक्रिस्ट...

  इंटरनॅशनल डेस्क- मागील आठवड्यात जागतिक सुर्यनमस्कार दिन (24 जानेवारी) जगभर साजरा करण्यात आला. भारताने जगाला योगाची देन दिली आहे. तसेही योगाचे अनेक प्रकार आहेत. मात्र, योग प्रकारातील सुर्यनमस्कार हा किंग (सर्वात मुख्य प्रकार) मानला जातो. जगभरात विविध भागांत अनेक योग गुरु आहेत. जे लोकांना योगाचे महत्व पटवून देतात. सोबतच ते लोकांना योगासुद्धा शिकवतात. त्यातील अनेक योग गुरु न्यूड योगा करतात, तर कोणी सामान्य योगा. असाच एक योग गुरु ब्रिटनमध्ये राहतो. त्याचे नाव स्टीवर्ट गिलक्रिस्ट आहे. हा योग गुरु 'हॉट योगा' शिकवतो. काय आहे 'हॉट योगा' प्रकार?

  - 54 वर्षांच्या स्टीवर्टचे एक योगा क्लास आहे, जो 'टचिएस्ट-फीलिएस्ट' नावाने प्रसिध्द आहे.
  - येथे लोकांकडून 90 मिनिटांचे योगासन करून घेतले जाते.
  - ब्रिटनच्या प्रिन्सचे नातेवाईक पिप्पा मिडलटन यांच्या संदर्भात स्टीवर्ट सांगतो, की जेव्हा ते कॅमडेन हाय स्ट्रीटवर भेटले तेव्हा मी त्यांना ओळखूच शकलो नाही. नंतर त्यांनी स्टीवर्टचे हॉट योगा क्लास जॉईन केला.

  वर्षातून एकदाच करतो अंघोळ-

  - स्टीवर्ट म्हणतो, की तो वर्षातून एकदाच अंघोळ करतो. ती सुध्दा समुद्रात. समुद्रात अंघोळ केल्यानंतर महिनाभर त्याच्या शरीरातून दुर्गंध येत नाही.
  - त्यानंतरच्या उर्वरित 11 महिन्याबाबत तो सांगतो की, अंगाचा दुर्गंध येत असला तरी लोकांना त्यातून काहीतरी आकर्षण निर्माण होते. त्याकडे प्रभावित होऊन लोक त्याच्या योगा शिकण्यासाठी येतात.
  - स्टीवर्ट कधीच केस कापत नाही. मला चाकू आणि कात्रीशिवाय आयुष्य कसे असते, हे मला जाणून घ्यायचे आहे.

  कलाकारांपासून प्रिन्सच्या नातेवाईकांपर्यंत सर्वांना शिकवतो योगा...

  - स्टीवर्टकडे प्रसिध्द लोकसुद्धा योगा शिकण्यासाठी येतात. त्यात ब्रिटनच्या प्रिन्सचे नातेवाईक पिप्पा मिडलटन, हॉलिवूड अभिनेता वुडी हारेलसन आणि केट मॉस यांच्यासह अनेक नावे सामील आहेत.
  - योग गुरु स्टीवर्ट गिलक्रिस्टला ब्रिटनमध्ये सर्वात टची- फीलि योगा टीचरच्या रुपात ओळखला जातो. त्याचे केस लांब आहे. त्याच्या केसातून दुर्गंधीसुध्दा येते, तरीदेखील लोक त्याच्याकडे हॉट योगा शिकण्यासाठी येतात.

  पुढे स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, हॉट योगा शिकवणा-या योग गुरुचे फोटो...

 • stewart gilchrist popular touchy feelest hot yoga class in Britain
  54 वर्षांच्या स्टीवर्टचे एक योगा क्लास आहे, जो 'टचिएस्ट-फीलिएस्ट' नावाने प्रसिध्द आहे.
 • stewart gilchrist popular touchy feelest hot yoga class in Britain
  येथे लोकांकडून 90 मिनिटांचे योगासन करून घेतले जाते.
 • stewart gilchrist popular touchy feelest hot yoga class in Britain
  स्टीवर्टकडे प्रसिध्द लोकसुद्धा योगा शिकण्यासाठी येतात. त्यात ब्रिटनच्या प्रिन्सचे नातेवाईक पिप्पा मिडलटन, हॉलिवूड अभिनेता वुडी हारेलसन आणि केट मॉस यांच्यासह अनेक नावे सामील आहेत.
 • stewart gilchrist popular touchy feelest hot yoga class in Britain
  स्टीवर्ट म्हणतो, की मी वर्षातून एकदाच अंघोळ करतो. ते सुध्दा समुद्रात. तरी सुद्धा महिना महिना माझ्या शरीराचा दुर्गंध येत नाही.
 • stewart gilchrist popular touchy feelest hot yoga class in Britain
  स्टीवर्ट कधीच केस कापत नाही. मला चाकू आणि कात्रीशिवाय आयुष्य कसे असते, हे मला जाणून घ्यायचे आहे.
 • stewart gilchrist popular touchy feelest hot yoga class in Britain
  एका विचित्र पोजमध्ये हॉट योगगुरु....

Trending