आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वित्झर्लंडमधील हे गाव इतके सुंदर की सरकारलाच घालावी लागली फोटोग्राफीला बंदी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्विर्त्झलंडमधील बर्गुन नावाचे गाव... - Divya Marathi
स्विर्त्झलंडमधील बर्गुन नावाचे गाव...

इंटरनॅशनल डेस्क- खरं तर एखाद्या गावाचे नाव ऐकताच आपल्याला निसर्ग व तेथील सुंदरता आठवते. मात्र, काय एखादे गाव एवढे सुंदर असू शकते का तेथे फोटोग्राफी करण्याला बंदी असू शकते. होय, आम्ही, स्वित्झर्लंडमधील बर्गुन नावाच्या एका गावाबाबत बोलत आहे. हे गाव इतके सुंदर आहे की, तेथे फोटोग्राफी करणे पूर्णपणे बंदी आहे. आणि तसे केल्यास तेथे 9 स्वित्झर्लंड डॉलर (सुमारे 413 रुपये) चा दंड भरावा लागतो. बंदीचे कारण आहे विचित्र...

 

- खरं तर, गावातील लोकांनीच या भागात फोटोग्राफी करण्यास बंदी घातली आहे. गावात जागोजागी नोटिस बोर्ड लावले गेले आहेत आणि त्यावर लिहले आहे की, गावात फोटोग्राफीला बंदी आहे. 
- नोटीस बोर्डावर हे लिहले आहे की, येथील सुंदरता आपल्या डोळ्यांनी पाहा आणि त्याचा आनंद लुटा. फोटोग्राफीद्वारे नाही. 
- जेव्हा आसपासच्या लोकांनी याचे कारण जानण्याचा प्रयत्न केला तेव्हा मेयर पीटर निकोलेने सांगितले की, ‘ आम्हाला नाही वाटत की येथे आलेल्या लोकांनी गावातील सुंदर फोटो फोटोज सेाशल मीडियात शेयर करावेत. कारण यामुळे असे लोक निराश होतात जे येथे येऊ शकत नाहीत. ’
- निकोलेने हे सुद्धा सांगितले की, शास्त्रीयदृष्ट्या हे ही स्पष्ट झाले आहे की, सुट्टीतील सुंदर फोटो अशा लोकांना नाराज करतात ते फिरायला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे येथे कायदा करून फोटोग्राफी करण्यावर बंदी घातली आहे. 
- गावातील पर्यटन संचालक मार्क एंड्रिया बारांडनच्या माहितीनुसार, नगर परिषद निवडणूकीत मिळालेल्या बहुमताच्या जोरावर येथे नवा कायदा बनवला गेला आहे.

 

अनेक लोकांनी म्हटले उत्तर कोरिया बनलेय हे गाव-

 

- गावातील फोटोग्राफीवर बंदीनंतर सोशल मीडियात याची खूप चर्चा होत आहे. 
- अनेक लोकांनी या निर्णयाचे कौतूक केले तर काहींनी उत्तर कोरियाशी केली.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बर्गुन गावातील फोटोज...

बातम्या आणखी आहेत...