Home | International | Bhaskar Gyan | valentines day: 7 wonder worldwide love stories

valentines day: भन्नाट आहे गुगल सीईओ सुंदर पिचाईंच्या सासरेबुवांची प्रेम कहाणी...

दिव्यमराठी वेब टीम | Update - Feb 14, 2018, 10:13 AM IST

यात त्या जोडप्यांच्या प्रेमाची कथा आहे, ज्यात वय 60 पेक्षा जास्त आहे. त्यांच्या प्रेमाची आणि संघर्षाची कथा मनोरंजक आहे.

 • valentines day: 7 wonder worldwide love stories
  मुजिबुल हक आणि होनुफा अख्‍तर रिक्ता....

  इंटरनॅशनल डेस्क- आज व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. आजच्या दिवशी लोक आपापले प्रेम व्यक्त करतात व भावी आयुष्यासाठी स्वप्न रंगवतात. ख-या प्रेमात वयाचे आणि जातीचे बंधन नसते. बस एकमेंकांवर जीव जडतो. व्हेलेन्टाइन दिनानिमित्त आम्ही काही अनोख्‍या लव्ह स्टोरीजविषयी सांगणार आहोत. यात त्या जोडप्यांच्या प्रेमाची कथा आहे, ज्यात वय 60 पेक्षा जास्त आहे. त्यांच्या प्रेमाची आणि संघर्षाची कथा मनोरंजक आहे. कोण आहे जोडपे...

  जेव्हा बांगलादेशच्या 67 वर्षांच्या रेल्वेमंत्र्यांने 29 वर्षाच्या मुलीशी केला विवाह

  2014 मध्‍ये बांगलादेशाचे एक मंत्री बरेच चर्चेत होते. मात्र आपल्या कामाच्या बाबत नव्हे तर विवाहाच्या कारणामुळे. 67 वर्षांचे असताना रेल्वेमंत्री मुजिबुल हक यांनी स्वत:पेक्षा 38 वर्षांनी छोट्या असलेल्या मुलीशी विवाह केला होता. कोमिलामध्‍ये एका भव्य कार्यक्रमात 29 वर्षांच्या होनुफा अख्‍तर रिक्तासह मुजिबूल विवाहा बंधनात अडकले होते. रेल्वेमंत्र्यांच्या या विवाहाची चर्चा बांगलादेशापासून विदेशातील माध्‍यमांपर्यंत झाली होती.

  पुढे स्लाईडद्वारे वाचा, भन्नाट आहे गुगल सीईओच्या सासरेबुवांची प्रेम कहाणी...

  तसेच आणखी अशाच काही अनोख्या लव्हस्टोरीबाबत...

 • valentines day: 7 wonder worldwide love stories
  होवर्ड अटबरी आणि सिंथिया...

   

  28 व्या वर्षी प्रेमात पडला, मात्र सांगायला लागली 62 वर्ष-

   

  देशात नव्हे तर विदेशातही अशीच काही किस्से पाहावयास मिळाले. अमेरिकेत सॅन डिएगो शहरात राहणारे होवर्ड अटबरी 1950 मध्‍ये 28 व्या वर्षी 18 वर्षांच्या सिंथिया रिग्सला कॅलिफोर्नियामध्‍ये भेटले होते. त्यावेळी दोघांनीही काही दिवस बरोबर नोकरी केली होती. होवर्ड सिंथियाच्या प्रेमात पडले. मात्र त्यावेळी सिंथियाचा प्रेमी दुसराच होता. यामुळे तो आपले प्रेम व्यक्त करु शकतनव्हता. नोकरीच्या वेळी दोघे एकमेंकांशी सांकेतिक भाषेत बोलत असायचे.

   

  62 वर्षानंतर कोडमध्‍ये लिहिले पत्र-

   

  यानंतर सिथिंया दुस-या शहरात निघून गेली. पुन्हा दोघे भेटले नाही. होवर्डने 62 वर्षांनंतर सिंथियाला प्रेम पत्र लिहिले. हे पत्र त्यांनी कोड भाषेत लिहिले होते. जेव्हा सिंथियाला पत्र मिळाले तेव्हा तिला आश्‍चर्य वाटले. मात्र कोड भाषा पाहून तिला होवर्डची आठवण आली. सिंथियाने लगेच उत्तर दिले आणि दोघे मे 2012 नंतर भेटले. शेवटी दोघांनी विवाह केला.

 • valentines day: 7 wonder worldwide love stories
  होलाराम हरियाणी आणि माधुरी
  भन्नाट आहे गुगल सीईओच्या सासरेबुवांची प्रेम कहाणी...
   
  गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे 73 वर्षांचे सासरे होलाराम हरियाणी यांनी मागील वर्षी 65 वर्षांच्या माधुरी शर्माशी विवाह केला. हरियाणी यांची पत्नी निलूची दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. दुसरीकडे त्यांच्याशी विवाह करणा-या माधुरी शर्मा यांचे पती राजेश चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. दोघेही एकटे होते. सत्संगात भेट झाली. भेटीतून प्रेम वाढले. शेवटी 23 सप्टेंबरमध्‍ये दोघांनी आर्य समाज मंदिरात विवाह केला.
   
  कसे दोघे आले जवळ?
   
  माधुरी या कोटाच्या आहेत. त्यांचा विवाह दिल्लीतील राजेश शर्माशी झाला होता. ते लष्‍कराच्या रस्ते बांधकाम शाखेत होते. त्यांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. माधुरी यांच्या एकुलत्या एक मुलगा भारत याचाही अपघातात मृत्यू झाला होता. त्या दिल्लीहून दोन वर्षांपूर्वी त्या कोटाला आल्या. येथील नयापूरमध्‍ये फ्लॅट घेऊन राहू लागल्या.
  पॉलिटेक्निकमध्‍ये प्राध्‍यापक राहिलेले हरियाणी मुंबईत राहत होते. एक वर्षापासून ते कोटात राहत आहेत. येथे ते भाड्याच्या घरात राहतात. त्यांचा एक मुलगा न्यूजर्सीमध्‍ये कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक आहे, तर मुलगी अंजली सॅन फ्रान्सिस्कोत राहतायत. अंजलीचे पती सुंदर पिचाई गुगलचे सीईओ आहे. हरियाणी यांनी सांगितले, की काही महिन्यांपूर्वी दोघेही जयपूर गोल्डनजवळील एका आश्रमात सत्संगात भेटले. विचार जुळले आणि दोघांनी विवाहा करण्‍याचा निर्णय घेतला.
   
  विरोध झाला, पण माधुरी मागे हटल्या नाही-
   
  माधुरी यांचे इतर नातेवाईक बरोबर होते. मात्र कोटात राहणारे माहेरची लोक त्यांच्या विरोधात होते. त्यांची पुतणी आणि पुतण्‍याने विरोध सुरु केला. त्यांनी माधुरी यांच्या विरोधात भडकवण्‍यास सुरुवात केली. त्या दोघांचा डोळा त्यांच्या संपत्तीवर होता. सोसायटीच्या लोकांनी त्यांना प्रचंड त्रास दिला. परंतु मला जे करावेसे वाटले ते मी केले.
   
  एकटे राहणे अशक्य होते-
   
  या वयात एकेक दिवस व्यतीत करणे अवघड असते, याची मला जाणीव होती. मी पतीच्या निधनानंतर चार वर्षे एकाकीच घालवले आहे. अमेरिकेत राहणारी तिची चुलत बहिणींनी दुसरा विवाह करायला सांगितले आणि मी तसे केले.
 • valentines day: 7 wonder worldwide love stories
  मटुकनाथ आणि जुली
   
  प्राध्‍यापक 30 वर्षांनी लहान विद्यार्थींच्या प्रेमात पडला

  बिहारचे प्राइज़ मटुकनाथ आणि त्यांची विद्यार्थींनी जुली यांच्यात 30 वर्षांचा फरक आहे. पहिल्यांदा वर्गात दोघांची भेट झाली होती. 2004 मध्‍ये मटुकनाथने एक कॅम्प लावला होता. यात जूलीही आली होती. तेव्हापासून दोघे बोलू लागले होते.
   
  जुलीने केले होते प्रपोज

  प्राध्‍यापकांची विद्यार्थींनी असलेल्या जुलीने त्यांना प्रपोज केले होते. मटुकनाथला एका दिवशी जुलीने फोन केला आणि ते तिला खूप आवडतात असे सांगितले. तिने विवाहा करण्‍याची इच्छा व्यक्त केली. मात्र यानंतर मटुकनाथ यांनी जुलीला हे अशक्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की अगोदरच विवाहित असून मुलेही आहेत. मात्र हळुहळू मटुकनाथही जुलीच्या प्रेमात पडले.
   
  2006 साली अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.जुलीशी प्रेमप्रकरणामुळे 15 जुलै, 2006 मध्‍ये पाटणा विद्यापीठाने मटुकनाथ यांना बीएन कॉलेजच्या हिंदी विभागाच्या रीडरपदावरुन निलंबित केले होते. नंतर 20 जुलै, 2009 मध्‍ये त्यांना सेवेतून मुक्त करण्‍यात आले.
 • valentines day: 7 wonder worldwide love stories
  एनडी तिवारी आणि उज्ज्वला.
   
  89 वर्षांच्या नेत्याने लिव्ह-इन जोडीदाराशी केला विवाह

  2014 मध्‍ये उत्तर प्रदेशचे 89 वर्षांचे नेते एनडी तिवारीने उज्ज्वलाशी विवाहा केला. वास्तविक लिव्ह-इनमध्‍ये असताना त्यांना एक मुलगा झाला होता. मात्र तिवारी तो मुलगा आपला असल्याचे मान्य करत नव्हते. नंतर बायोलॉजिकल पित्याचे प्रकरण न्यायालयात पोहोचले.
   
   त्या मुलाचे नाव रोहित शेखर. त्याने या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला होता. ब-याच नाट्य प्रकारानंतर एनडी तिवारींनी त्या मुलाला त्याच्या आईसह स्वीकार केला. त्यांनी पारंपरिक पध्‍दतीने विवाह केला. आता रोहित आणि त्याची आई एनडी तिवारींसह एकत्र राहतात. 
 • valentines day: 7 wonder worldwide love stories
  भजनलाल आणि चंद्रकांता.
   
  68 वर्षांचा वर आणि 62 वर्षांची वधू, कुटुंब नाखुश

  तीन विवाहित मुलांच्या 68 वर्षांच्या पित्याने 62 वर्षांच्या प्रेशर विवाह केला. भजनलालने आपली मैत्रीण चंद्रकांताशी पुस्करच्या एका मंदिरात विवाह केला.
   
  पाच वर्षांपूर्वी झाली होती भेट-

  विवाहानंतर भजनलाल यांनी सांगितले, की 31 वर्षांपूर्वी त्यांची पहिली पत्नी व आईचा एका अपघातात निधन झाले होते. त्यांना तीन मुले आहेत. तिघांचाही  विवाहा झाला आहे. दुसरीकडे चंद्रकांताचा विवाहा वयाच्या 17 व्या वर्षी विवाह झाला होता. मात्र त्यांच्या पत्नीने पहिल्याच दिवशी तिला नाकारले होते. चंद्रकांता यांची भजनलाल यांच्याशी पाच वर्षांपूर्वी भेट झाली होती. दु:खी चंद्रकांताला आधार देण्‍यासाठी त्यांनी विवाह करण्‍याचा निर्णय घेतला.
 • valentines day: 7 wonder worldwide love stories
  विवाहाचा अर्ज घेऊन राजाराम पोहोचलेले प्रभारी जिल्हाधिका-यांकडे.
  70 वर्षांचे राजाराम, 22 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले-

  मध्‍य प्रदेशच्या हरदामध्‍ये एक अनोखे प्रेम प्रकरण समोर आले आहे. येथे 70 वर्षांच्या राजारामला आपल्यापेक्षा 50 वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात पडले. ते आता तिच्याशी विवाहा करणार आहे.
  अर्ज पाहून प्रभारी जिल्हाधिकारीही आश्‍चर्यचकित झाले

  हरदा जिल्ह्यात प्रत्येक दिवशी जन सुनवाणी चालू होती. अप्पर जिल्हाधिकारी गणेश शंकर मिश्रा जन सुनवाणी करत होते. या दरम्यान हरदाचे रहिवाशी राजारामने सरकारी मदतीसाठी अर्ज केला. मात्र मदतीचे कारण पाहून जिल्हाधिकारी अवाक् झाले.
   
  राजाराम यांनी पत्रात हे लिहिले होते

  राजाराम लिहितात, की त्यांच्या पत्नीचा मृत्यू दहा वर्षांपूर्वी आजाराने मृत्यू झाला होता. आता ते एका युवतीच्या प्रेमात पडले आहेत. तीही त्याच्यावर प्रेम करते. दोघांनाही विवाहा करायचा आहे. मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते अशक्य आहे.
   

Trending