Home | International | Bhaskar Gyan | Apple Employees Keep Smacking Into Their Glass Office Like Dumb Little Birds

अॅपलचे संपूर्ण ग्लासचे नवे ऑफिस कर्मचा-यांसाठी डोकेदुखी; लोक वैतागले वाचा अनुभव

दिव्यमराठी वेब टीम | Update - Feb 25, 2018, 01:53 PM IST

अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांनी कंपनीच्या मुख्यालयाची इमारत जगामध्ये एकमेवाद्वितीय बांधण्याचे स्वप्न पाहिले होते.

 • Apple Employees Keep Smacking Into Their Glass Office Like Dumb Little Birds
  संपूर्ण ग्लासचे अॅपलचे नवे ऑफिस कर्मचा-यांसाठी व लोकांसाठी डोकेदुखी बनले असून लोक वैतागले आहेत.

  इंटरनॅशनल डेस्क- अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांनी कंपनीच्या मुख्यालयाची इमारत जगामध्ये एकमेवाद्वितीय बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. अवकाश यानाप्रमाणे ही इमारत असावी, अशी त्यांची कल्पना होती. 2011 मध्ये त्यांनी अशा इमारतीचा आरखडादेखील मांडला होता. मात्र त्यांच्या हयातीत तशी इमारत बांधली गेली नाही. त्यामुळे कंपनीने आपले नवे मुख्यालय त्यांच्या कल्पनेच्या आधारे उभारले आहे. संपूर्ण इमारत काचेची आहे. गोलाकार असून यात कंपनीचे डिझाइन केले आहे. तेदेखील काचेचे आहे. यामध्ये एक समस्या आहे. अनेक लोकांना पारदर्शन रचना लक्षात न आल्याने त्यांची टक्कर होते. अॅपल पार्क नावाने प्रसिद्ध ही इमारत बांधणी सुरू झाली तेव्हाच अनेक लोकांची टक्कर झाली होती. सात जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले.

  कॅलिफोर्नियाच्या कुपरतिनो येथे उभारण्यात आलेल्या या इमारतीमध्ये 45 फूट उंच अर्धगोलाकार काचेचे पटल आहेत. यामध्ये बसून कर्मचारी काम करतात. कोणी आत येत असेल तर बोलण्या आधीच ती व्यक्ती काचेवर आदळते.

  हा एकमेव प्रसंग नाही. अनेकदा असे घडले आहे. 2011 मध्ये अॅपलच्या याच प्रकारच्या काचेच्या दालनात 83 वर्षीय महिला आली तेव्हा काचेची भिंत दिसली नाही. तिच्या नाकाला जखम झाली. तिने आपली नाराजी कंपनीला कळवली. न्यायालयात दावा ठोकला. या महिलेने म्हटले की, काचेच्या भिंतीवर सूचना लिहिणे गरजेचे होते. त्यामुळे लोक जखमी होणार नाहीत.

  या सूचनेचे पालन करण्यासाठी अॅपलच्या काही कर्मचाऱ्यांनी कागदी पोस्ट या भिंतीवर चिटकवले आहेत. त्यामुळे भिंत असल्याचे लोकांना कळते. मात्र इमारतीचे डिझाइन यामुळे विद्रुप दिसते. त्यामुळे पुन्हा हे कागद काढण्यात आले. या मुख्यालयाला वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. प्रसिद्ध आर्किटेक्ट नॉर्मन फोस्टर यांनी आपल्या कौशल्याची साक्ष या रूपात दिली. यामध्ये स्टीव्ह जॉब्जच्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. 13 हजार अॅपल कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था यात आहे. खुलेपणा व स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून या इमारतीला प्रसिद्धी दिली गेली. अॅपलमध्ये आतापर्यंत एकट्याने काम करण्याच्या संस्कृतीचा पुरस्कार केला गेला. मात्र काचेच्या भिंतीची रचना या एकल कार्यसंस्कृतीला अनुरुप नाही.

  या बाबतीत अॅपलच्या प्रवक्त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. सिलिकॉन व्हॅलीमधील सुरक्षा व आरोग्य विभागाच्या प्रवक्त्याचे म्हणने आहे की, अॅपलच्या सुरक्षाविषयक दस्तावेजांना सरकारी एजन्सीच्या संकेतस्थळावरून मिळवता येते. या संकेतस्थळावर कॅलिफोर्नियातील अॅपलच्या आवारात व इमारतीत कोणीही जखमी झाल्याची माहिती दिलेली नाही.

  असे आहे अॅपल पार्क-

  - 13 हजार कर्मचारी येथे काम करतात
  - 175 एकर म्हणजे 71 हेक्टर जमीन
  - 28 लाख वर्गफुटांत इमारत उभारली आहे
  - 83 हजार वर्गफुटांत केवळ बैठका होतात
  - 1512 फूट व्यास असून इमारत गोलाकार आहे.
  - 2000 नियुक्त्या संशोधन व विकासासाठी आहेत.

  पुढे स्लाईडद्वारे वाचा, अॅपलच्या नव्या ऑफिसबाबत अधिक माहिती व फोटोज...

 • Apple Employees Keep Smacking Into Their Glass Office Like Dumb Little Birds
  या बिल्डिंगसाठी एकून 33 हजार 412 कोटी रूपये (5 बिलियन डॉलर) खर्च आला आहे. चार मजली इमारतीत सर्वात मोठे 360 डिग्रीत कोडवर वाकलेले ग्लास लावलेले आहेत.

  कसे आहे स्टीव्ह जॉब्जच्या स्वप्नातील अॅपलचे ऑफिस-

   

  - या नव्या बिल्डिंगला ‘अॅपल पार्क’ नाव दिले गेले आहे, जे स्पेसशिप सारखे आहे. 
  - सुमारे 175 एकरात पसरलेले हे ऑफिस जगातील सर्वात मोठे ईको फ्रेंडली ऑफिस आहे. 
  - ऑफिसच्या बाहेरच नाही, तर कॅम्पस एरियात इतकी हिरवळ आहे की, कर्मचा-यांना निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखे वाटते. 
  - ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा आणि सुर्यप्रकाश येईल याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. ज्यामुळे वर्षातील नऊ महिने ऑफिसमध्ये एसीची गरज खूपच कमी राहते. 
  - या बिल्डिंगची खास बाब ही की, याच्या पायाभरणीत 700 ‘बेस आयसोलेशन’ जोडले गेले आहेत, ज्यात भूकंप आला तरी इमारतीला नुकसान होणार नाही. 
  - आत्पकालीन स्थितीला तोंड देण्यासाठी कॅम्पसमध्ये रूग्णालय, फायर हाऊस, पोलिस स्टेशन यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
  - येथे एक हजार लोक बसू शकतील या क्षमतेचे एक ऑडिटोरियम सुद्धा बनवले गेले आहे, ज्यात कंपनीचे अधिकारी कंपनी संबंधित माहिती मीडिया आणि अन्य इतर लोकांशी देऊ शकतील. 
  - या बिल्डिंगसाठी एकून 33 हजार 412 कोटी रूपये (5 बिलियन डॉलर) खर्च आला आहे. चार मजली इमारतीत सर्वात मोठे 360 डिग्रीत कोडवर वाकलेले ग्लास लावलेले आहेत. 
  - या ऑफिसचे पूर्ण डिझाईन अॅप्पलचे संस्थापक स्टीव जॉब्सने 2011 मध्ये केले होते. हे ऑफिस जॉब्सचे स्वप्न मानले जाते.
  - मात्र, 5 ऑक्टोबर, 2011 मध्ये त्याचे निधन झाले. त्याच्या स्मरणार्थच तेथे एक थिएटर (प्रेक्षागृह) बनवले गेले आहे. 
  - 165 फूटाचा व्यास असलेल्या या थिएटरचे 20 फूट उंच प्रवेशद्वारावर लिंड्रिकल काच लावण्यात आली आहे.

 • Apple Employees Keep Smacking Into Their Glass Office Like Dumb Little Birds
  अॅपलचे हे हेड क्वार्टर कॅलिफोर्नियातील क्यूपरटिनोत आहे.
 • Apple Employees Keep Smacking Into Their Glass Office Like Dumb Little Birds
  स्टीव्ह जॉब्ज प्रेक्षागृह
 • Apple Employees Keep Smacking Into Their Glass Office Like Dumb Little Birds
  नवीन कॅम्पसची कल्पना स्टीव्ह जॉब्ज यांचीच असल्याने हे प्रेक्षागृह त्यांना समर्पित करण्यात आले आहे.
 • Apple Employees Keep Smacking Into Their Glass Office Like Dumb Little Birds
  ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा आणि सुर्यप्रकाश येईल याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. ज्यामुळे वर्षातील नऊ महिने ऑफिसमध्ये एसीची गरज खूपच कमी राहील.
 • Apple Employees Keep Smacking Into Their Glass Office Like Dumb Little Birds
  सुमारे 175 एकरात पसरलेले हे ऑफिस जगातील सर्वात मोठे ईको फ्रेंडली ऑफिस आहे.
 • Apple Employees Keep Smacking Into Their Glass Office Like Dumb Little Birds
  या नव्या बिल्डिंगला ‘अॅपल पार्क’ नाव दिले गेले आहे, जे स्पेसशिप सारखे आहे.
 • Apple Employees Keep Smacking Into Their Glass Office Like Dumb Little Birds
  अॅपलच्या नव्या ऑफिसचा एरियल व्य्हू...

Trending