आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांची हायटेक Cadillac Beast स्टेट कार, जी आहे हाय सिक्योर अन् ब्लास्ट प्रूफ..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूएसची हायटेक प्रेसिडेंट कार कॅडिलेक 'द बीस्ट' - Divya Marathi
यूएसची हायटेक प्रेसिडेंट कार कॅडिलेक 'द बीस्ट'

इंटरनॅशनल डेस्क- डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी आजच्याच दिवशी (20 जानेवारी) रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली होती. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. 

 

71 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे मूळचे उद्योगपती आहेत. बिझनेसमधून राजकारणात येऊन राष्ट्राध्यक्ष बनणारे ट्रम्प हे पहिलेच नेते आहेत. ट्रम्प यांची लाईफस्टाईल खूपच अलिशान राहिली आहे. आपल्या लग्झरी लाईफस्टाईल सोबतच ट्रम्प आता यूएसची हायटेक प्रेसिडेंट कार कॅडिलेक 'द बीस्ट' चा वापर करत आहेत. ट्रम्प यांना ही नवी स्टेट कार देण्याआधी जनरल मोटर्स कंपनीने तिचा चेहरा- मोहरा बदलला होता. प्रेसिडेंटपदाची सूत्रे हाती येताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यात ही शानदार सवारी दाखल झाली होती. ट्रम्प यांच्यासाठी कॅडिलेक बीस्टमध्ये हे केले बदल...

 

- राष्ट्राध्यक्षांसाठी दिलेल्या Cadillac Beast या कारमधील बदलासाठी जनरल मोटर्सने सुमारे 100 कोटी रूपये खर्च केले आहेत. 
- आपल्या माहितीसाठी हे की, व्हाईट हाऊसमध्ये एकून 12 बीस्ट आहेत आणि जनरल मोटर्सला एक कार बनविण्यासाठी 10 कोटी रूपये रुपये खर्च येतो.
- माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी Cadillac Beast मधील लांबलचक कार घेणे पसंत केले होते.
- तर सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलनेने आखुड पण हाय सिक्योर कॅडिलेक बीस्ट कार निवडली आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी तयार केलेली हाय सिक्योर कार बीस्ट...