आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: फ्लोरिडातील पाम बीचवर 17 एकरात पसरलाय ट्रम्प यांचा अलिशान महल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्ड ट्रम्प यांचे फ्लोरिडामधील पाच बीचवरील अलिॆशान महल 'मार-ए लागो'. - Divya Marathi
डोनाल्ड ट्रम्प यांचे फ्लोरिडामधील पाच बीचवरील अलिॆशान महल 'मार-ए लागो'.

इंटरनॅशनल डेस्क- डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी आजच्याच दिवशी (20 जानेवारी) रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली होती. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. 

 

71 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे मूळचे उद्योगपती आहेत. बिझनेसमधून राजकारणात येऊन राष्ट्राध्यक्ष बनणारे ट्रम्प हे पहिलेच नेते आहेत. ट्रम्प यांची लाईफस्टाईल खूपच अलिशान राहिली आहे. ट्रम्प यांच्या न्यूयॉर्कमधील मॅनहट्टन स्थित सोन्याने मढवलेल्या पेंटहाऊस (ट्रम्प टॉवर्स) बाबत तुम्ही ऐकले असेलच. मात्र, फ्लोरिडातील पाम बीच किना-यावर बनलेल्या त्यांच्या अलिशान महलपुढे पेंटहाऊस तर काहीच नाही. होय, एकून 17 एकरात पसरलेल्या या अलिशान महलाचे नाव आहे ‘मार-ए-लागो’. 126 रूम्स आणि 210 टेलिफोन...

 

- ट्रम्पने हा महल 1985 मध्ये खरेदी केले आहे. यानंतर त्यांनी बदल करून आणखी अलिशान बंगला बनवला.
- यात थिएटर, प्रायवेट क्लब आणि स्पा सुद्धा आहे.
- ट्रम्प यांनी येथून 3 स्टेट प्रीमरिज जिंकल्यानंतर स्पीच सुद्धा दिले होते. 
- फ्लोरिडातील पाम बीचवर असलेला हा महल भाड्यानेही दिला जातो. 
- यात ट्रम्प प्रत्येक वर्षी 1.5 लाख डॉलरपेक्षा अधिक कमाई करतात.
- 25,000 कोटी रूपयाच्या संपत्तीचे मालक असलेले ट्रम्प रियल स्टेटमधील नामांकित बिजनेसमॅन आहेत.
- ते 100 हून अधिक कंपन्यांचे मालक आहेत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील पाम बीचवरील अलिशान महलाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...