आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा ट्रम्प कन्या इव्हांकाला, ट्रम्प म्हणाले होते, मुलगी नसती तर डेटवर घेऊन गेलो असतो!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इव्हांका ट्रम्प.... - Divya Marathi
इव्हांका ट्रम्प....

इंटरनॅशनल डेस्क- डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी आजच्याच दिवशी (20 जानेवारी) रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली होती. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचा दारूण पराभव करण्यासाठी ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये त्यांची मुलगी इव्हांका ट्रम्प हिने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. पडद्यामागे राहून ट्रम्प यांच्या इमेजबाबत इव्हांका काम करत होती. ट्रम्प यांची वक्तव्ये किंवा त्यांना अडचणीत आणणाऱ्या बाबींवर मात कशी करायची हे इव्हांका पाहत होती.

 

संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये इव्हांका पूर्णवेळ ट्रम्प यांच्याबरोबरच असल्याचे पाहायला मिळाले होते. पण वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प यांनी इव्हांकाबाबतही वादग्रस्त स्टेटमेंट केले होते. इवांका खूपस सुंदर व सेक्सी आहे. ती जर माझी मुलगी नसती तर मी तिला सुद्धा डेट केले असते, असे ट्रम्प यांनी एकदा मुलाखतीदरम्यान वक्तव्य केले होते. इव्हांकाही अत्यंत बोल्ड लाईफस्टाईल जगणारी आहे. आज ती आपले पिता व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सल्लागार म्हणून काम पाहत आहे. यानिमित्ताने आपण पाहूया इव्हांका हिचे फोटोज...

 

पुढील स्लाईड्सवर पाहा, इव्हांका ट्रम्प यांचे काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...