Home | International | Bhaskar Gyan | Putin claims new invincible missile can pierce US defenses

रशियाची ही 10 विनाशकारी हत्यारे, ज्याने अमेरिकेचे पळवले तोंडचे पाणी

दिव्यमराठी वेब टीम | Update - Mar 04, 2018, 11:48 AM IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतिन यांनी गुरूवारी अशा अण्वस्त्र शस्त्राचे सादरीकरण केले ज्याने अमेरिकेची झोप उडाली आ

 • Putin claims new invincible missile can pierce US defenses
  रशियाचे एमआय-28 हेलीकॉप्टर...

  इंटरनॅशनल डेस्क- रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतिन यांनी गुरूवारी अशा अण्वस्त्र शस्त्राचे सादरीकरण केले ज्याने अमेरिकेची झोप उडाली आहे. या सादरीकरणावेळी दाखवलेल्या एका व्हिडिओ ग्राफिक्समध्ये रशिया अमेरिकेतील फ्लोरिडावर क्षेपणास्त्र हल्ले करताना दिसत आहे. आता तुम्हाला वाटेल की, रशिया फ्लोरिडावर हल्ला का करू इच्छितो. तर फ्लोरिडात वॉल्ट डिज्ने वर्ल्ड आणि एवरग्लेड्स नॅशनल पार्क सारखे पर्यटक स्थळे आहेत. सोबतच तेथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मार-ए-लागो रिसॉर्ट आहे. ज्यात अनेक अण्वस्त्र बंकर आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तेथे नेहमीच वीक एंडला जात असतात.

  पण अमेरिका व रशिया हा संघर्ष काही नवा नाही. शीत युद्धाच्या काळापासून या दोन देशात सत्तासंघर्ष कायम आहे. मागील काही वर्षापासून इसिस व सीरिया प्रकरणावरून रशिया-अमेरिका आमने-सामने येतच असतात. पण सध्या रशिया वरचढ ठरताना दिसत आहे. तसेच तो अमेरिकेला आपल्या तालावर नाचवत आहे. अर्थातच यामागे त्यांच्याकडे असलेली शस्त्रास्त्रांचीही जोड आहे. त्याच जोरावर रशिया अमेरिकाला अधून-मधून धमकी देत असतो. मात्र, लोकशाही प्रधान अमेरिका रशियाला जगभरात एकटे पाडण्याचा प्रयत्न करतो व त्यात यशस्वी होतो. कारण रशिया एक कम्यूनिस्ट देश आहे व तेथे एकाधिकारशाही आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन जगातील सर्वात धोकादायक हुकुमशहांपैकी एक आहेत. आज यानिमित्त आपण पाहूया रशियाच्या घातक हत्यारांबाबत....

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रशियाच्या घातक हत्यारांबाबत....

 • Putin claims new invincible missile can pierce US defenses
  एसयू- 34 फायटर बॉम्बर
  स्पीड- 2,200 किमी प्रतितास
  रेंज - 4 हजार किमी
  किंमत- सुमारे 4 हजार कोटी रुपये
   
  रशियाचे हे सर्वात आधुनिक फायटर जेट्स आहे. सीरियात अमेरिकेचा हस्तक्षेप वाढताच रशियाने ही विमाने सीरियात दाखल केली. सीरियातील दहशतवादी कॅम्पावर आणि त्यांच्या हत्यारांवर याच फायटर विमानाने निशाणा साधला होता.
 • Putin claims new invincible missile can pierce US defenses
  गाईडेड मिसाईल क्रूजर मस्कवा
  स्पीड - 32 नॉट्स (59 किमी प्रतितास)
  रेंज - 19 हजार किमी
   
  रशियाने कॅस्पियन समुद्रातील वॉरशिपमधून 2400 किमी दूर सीरियात याद्वारे मिसाईल डागली. सध्या हे सीरिया कोस्टवर तैनात आहे. सामान्यपणे रशियाचे हे विनाशकारी वॉरशिप ब्लॅक सी मध्ये कायम आढळतात.
 • Putin claims new invincible missile can pierce US defenses
  टी-90 टँक
  स्पीड - 60 किमी प्रतितास
  रेंज - 550 किमी
  किंमत - 30 कोटी रुपये

  टी-90 टँक अन्य टँकांच्या तुलनेत वजनाने हलका असतो. ज्यामुळे त्याचे संचलन करणे सोपे जाते. तसेच त्याची दिशा वेगाने बदलता येते. रशियाने सीरियन आर्मीला हेच टँक मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले. त्याचमुळे इसिसचे शेकडो ठिकाणे बरबाद करता आले.
 • Putin claims new invincible missile can pierce US defenses
  सुखोई एएयू-30
  स्पीड - 1,350 किमी प्रतितास
  रेंज - 3 हजार किमी
  किंमत - सुमारे 2 हजार कोटी रुपये
   
  सध्या सीरियात रशियाची 24 सुखोई एसयू-30 जेट्स उडडाण भरतात. ही विमाने रोज सीरियाची पोर्ट सिटी लताकियामधून उड्डाण करतात आणि दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ले करून परत येतात.
 • Putin claims new invincible missile can pierce US defenses
  सुखोई एसयू-25
  स्पीड - 950 किमी प्रतितास
  रेंज - 750 किमी
  किंमत - 2775 कोटी रुपये
   
  सुखोई एसयू-30 जेट्ससोबत सीरियन आर्मीच्या मदतीसाठी 15 सुखोई एसयू-25 जेट्स पाठवली आहेत. ही जेट्स सीरियन आर्मीच्या एयरफोर्ससोबत उड्डाण भरतात. त्यांना आवश्यकतेनुसार सीरियातील वेगवेगळ्या भागात नेले जाते.
 • Putin claims new invincible missile can pierce US defenses
  सुखोई एसयू-24
  स्पीड - 1,315 किमी प्रतितास
  रेंज - 2,750 किमी
  किंमत - 1 हजार कोटी रूपये
   
  हे जेट्स सुखोई एसयू-30 आणि सुखोई एसयू-24 ला बॅकअप देण्याचे काम करतो. अमेरिका किंवा दहशतवादी क्षेपणास्त्रांपासून रशियाच्या जेट्सला कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून. त्याच केवळ एका कामासाठी ही जेटस सीरियात पाठवली आहेत. सीरियात याची संख्या २० च्या घरात आहे.
 • Putin claims new invincible missile can pierce US defenses
  एमआय-24 हेलीकॉप्टर
  स्पीड - 335 किमी प्रतितास
  रेंज - 450 किमी
  किंमत - 81 कोटी रुपये
   
  रशियाने सीरियात 14 हेलिकॉप्टर पाठवली आहे. क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली ही हेलिकॉप्टर अचूक निशाणा साधण्यात माहिर आहेत. सीरियातील अलेप्पो शहरात सर्वात जास्त हानी याच हेलिकॉप्टर्सनी केली आहे.
 • Putin claims new invincible missile can pierce US defenses
  एसए-22
  स्पीड - 2 सेकंदात 5 किमी
  रेंज - 35 किमी
   
  रशियाची हवाई सुरक्षा मिसाईल प्रणाली एस-22 ने सीरियाला बाहेरील हल्ल्यापासून वाचविण्यात मोठे योगदान दिले. याची तैनाती सीरियन प्रेसिडेंट असद यांच्या सांगण्यावरून करण्यात आली. याबाबत सांगितले जाते की, याची तैनाती फक्त अल-असल एयरबेसवरच नाही तर अनेक ठिकाणांवर केली गेली आहे. ही सीरियात अशा ठिकाणी लपवून ठेवली गेली आहे की कोणत्याही सॅटेलाईटची यावर नजर पडू शकत नाही.
 • Putin claims new invincible missile can pierce US defenses
  याकोवलेव पचेला
  स्पीड - 180 किमी प्रतितास
  रेंज - 60 किमी
  वजन - 138 किलो
   
  रशियात या ड्रोनची निर्मिती 1990 मध्ये सुरु झाली. रशियाने सुमारे 30 ड्रोन सीरियात पाठवले आहेत. त्याचा वापर दहशतवाद्यांची ठिकाणे व त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी केला गेला. स्पीड चांगले असल्यामुळे दहशतवादी त्याला सहजासहजी पाडू शकत नाहीत. याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारवरच सीरियन लष्कराने दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले आहेत.
 • Putin claims new invincible missile can pierce US defenses
  जीएजेड जीप
  स्पीड - 140 किमी प्रतितास
  रेंज- 100 किमी
  किंमत - 28 लाख रुपये.
   
  रशियाची ही खतरनाक जीप मिलट्रीजवळील सर्वात महत्त्वाचे हत्यारांपैकी एक आहे. स्पीडसोबतच ही जाप कोणत्याही चढ-उतार, खड्डे, पर्वतात, वाळवंटात रस्ताने पळवू शकता. बुलेटप्रूफ ग्लास ट्यूबलेस टायरने लेस असलेली या जीपमध्ये मशीन गनशिवाय लावा ग्रेनेड लॉन्चर सुद्धा आहे. याच्या मदतीने सीरियन लष्कराने दहशतवाद्यांचा गड असलेल्या भागात जाऊन त्यांची शिकार केली होती. एवढेच नव्हे तर सैनिक या जीपमध्ये बसून अकाशातील 2 किमीपर्यंतच्या रेंजमधील कोणतेही फ्लाईंग ऑब्जेक्टला पाडू शकते. तर, जमीनीवर मशीन गनची रेंज 100 किमीपर्यंत आहे.

Trending