आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क- रशियातील सायबेरियात आर्कटिक ब्लास्ट झाला आहे. येथील तापमानाचा पारा मायनस 67 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली घसरला आहे. तसेच या संपूर्ण प्रदेशात पारा मायनस 40 डिग्री सेल्सियस ते मायनस 67 डिग्री सेल्सियसपर्यंत आहे. केस, आईब्रो आणि दाढीवर सुद्धा बर्फ जमत आहे. कार आणि बाईक तर बर्फाने चोक झाल्या आहेत. सर्वात जास्त थंडी काउंटी मानसी भागात नोंदवली गेली आहे. तेथे पारा मायनस 62 डिग्री आहे. मागील 84 वर्षातील हे सर्वात कमी तापमान ठरले आहे. दरम्यान, कडाक्याच्या थंडीने दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 6 फेब्रुवारी 1933 मध्ये मायनस 67.2 डिग्री नोंदवले होते....
- सायबेरियात पडलेल्या थंडीमुळे मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक डिवाईसेस बंद पडले आहेत.
- येथे सर्वात कमी तापमान 6 फेब्रुवारी 1933 मध्ये मायनस 67.2 डिग्री रिकॉर्ड केले होते.
- मात्र, यंदा त्याचाही रिकॉर्ड मोडत पारा 67.7 डिग्री सेल्सियसवर घरसल्याचे सायबेरिन टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
- दरम्यान पृथ्वीतलावरील सर्वात कमी तापमान 2013 साली ईस्ट अन्ट्रांटिकामध्ये -94.7 C इतके नासाच्या सॅटेलाईटने टिपले होते.
जानेवारीत -62 ते -65 डिग्री सेल्सियस दरम्यान राहतो पारा-
- लोकवस्ती असलेला सायबेरिया या जगातील सर्वात थंड प्रदेश आहे. येथे 83 वर्षानंतर सर्वात जास्त थंडी पडली आहे.
- जानेवारीत येथील पारा मायनस 60 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहतो. पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण अंटार्कटिका आहे. तेथील तापमान मायनस 89.2 डिग्री सेल्सियस राहते.
- आर्कटिक ब्लास्टमुळे ठिकठिकाणी हवेत बर्फ साचलेले दिसत आहे.
काय होतो परिणाम?
- एवढ्या कमी तापमानात हाडेही तुटतात.
- या भयंकर व जीवघेण्या थंडीमुळे जंगली प्राणी, हरणे आणि घोडे सुद्धा रहिवासी अपार्टमेंटमध्ये शिरू लागली आहेत.
काय आहे आर्कटिक ब्लास्ट?
- उत्तरी ध्रुवाला आर्कटिक म्हटले जाते. येथे महासागर सुद्धा आहे.
- तापमान खूपच कमी असल्याने लोअर लॅटिट्यूड (अक्षांश) वाल्या या भागात बर्फाळ वादळे येतात. सर्वत्र बर्फाचे महाकाय लाद्या तयार होतात.
- सायबेरिया आर्कटिकच्या जवळ आहे. त्यामुळे तेथे ब्लास्टचा धोका नेहमीच जास्त असतो. त्यावेळी तापमान खूपच खाली घसरलेले असते.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सायबेरियातील सद्य स्थितीचे फोटोज....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.