आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FAKE फोटोज पोस्ट करून बनली स्टार, ताजमहलमुळे पकडली गेली चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेलियाने शेयर केलेला ताजमहलचा फोटो... - Divya Marathi
अमेलियाने शेयर केलेला ताजमहलचा फोटो...
इंटरनॅशनल डेस्क- एखाद्या सुंदर वास्तूला त्याच्या ख-या रूपात पाहिले तर चार चांद लागले असे म्हटले जाते. मात्र, काही लोक येथेही काहीतरी छेडछाड करायला मागे पुढे पाहत नाहीत. असेच काहीसे इंग्लंडची इंस्टाग्राम क्वीन अमेलिया लियानाने केले. अमेलिया फॅशन मॉडेल आणि ट्रॅव्हल ब्लागर्स आहे. सध्या अमेलिया जगातील ऐतिहासिक स्थळांच्या फोटोजसोबतच छेडछाड केल्यामुळे लोकांच्या निशाण्यावर आली आहे. अनेक मॅगझीनला विकते फोटोज...
 
- अमेलियावर आरोप झाला की, तिने प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉटमधील फोटोत एडिटिंग केले आहे. 
- अमेलियाने ताजमहलपासून न्यूयॉर्क फ्रीडम टॉवर यासारख्या अनेक फेमस टूरिस्ट स्पॉटवरील फोटोचे एडिटिंग करत शेयर केले. 
- तिची पोल खुलताच अमेलियाने आपली चूक मान्य करत आपणाला कोणालाही नाराज करण्याचा उद्देश नव्हता असे म्हणते.
-तिने हे ही मान्य केले त्या ठिकाणी ती आतापर्यंत गेलीच नाही. अमेलिया अनेक मॅगझीन आणि कंपन्यांना आपले फोटोज विकते. 
 
अशी पडकली गेली तिची चोरी-
 
- अमेलियाने पहिला फोटो ताजमहलचा पोस्ट केला, ज्यात आकाशात उडणा-या कबूतरांचा घोळका दिसत होता. मात्र, फोटोत एकही टूरिस्ट दिसत नव्हता. सध्या ताजमहलाच्या मीनारचे काम सुरु आहे ज्यामुळे तेथे जाळ्या लावल्या आहेत. मात्र, अमेलियाने एडिट करत त्या जाळ्या काढून टाकल्या. तर, ताजमहलात गर्दीच्या ठिकाणाला एकच ठिकाण असल्याचे सांगितले. 
- यानंतर तिने दुसरा फोटो न्यूयॉर्क रॉकरफेलर सेंटरचा पोस्ट केला. ज्यात फ्रीडम टॉवर स्पष्ट दिसतो. मात्र, अमेलियाने शेयर केलेल्या या फोटोतून तो टॉवर गायब आहे. 
- धक्कादायक बाब तर ही होती की, अमेलियाने इंस्टाग्राफवर हे फोटोज पोस्ट करत लिहले की, हे फोटोज तिने तेथे जाऊन (टूरिस्ट प्लेसेजवर) काढले आहेत.
- अमेलियाला या चुकीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते कारण ती अनेक कंपन्या व मॅगझीनला आपले फोटोज विकते. 
- अमेलिया इंग्लंडमध्ये किती फेमस आहे, याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, इंस्टाग्रामवर तिचे सुमारे साडे चार लाख फॉलोअर्स आहेत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अमेलियाने पोस्ट केलेला न्यूयॉर्क टॉवरचा फेक आणि तिचे काही इतर फोटोज...