इंटरनॅशनल डेस्क- 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. जपानमधील ती सकाळ काही वेगळीच होती. लोक नेहमीप्रमाणे कामावर निघणारच होते. त्याचवेळी अमेरिकेच्या बॉम्बहल्ला करणारे विमान बी-29 ने हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. जमिनीपासून सुमारे 31 हजार फूट उंचीवरून फेकलेल्या या बॉम्बने क्षणात उद्धवस्त केले. यात 1 लाख 40 हजार लोक मारले गेले. ऑपरेशन 'लिटिल बॉय'...
- या अणुबॉम्ब हल्ल्यांचे सांकेतिक नाव लिटल बॉय असे होते. मात्र हे लिटल बॉय जपान आणि माणुसकीला खोल जखम देऊन गेला.
- लिटल बॉयला दुस-या महायुध्दाच्या वेळी अमेरिकेतील मॅनहॅट्टन प्रकल्पांतर्गत लॉस अलामोसमध्ये बनवण्यात आला होता.
- जवळपास 4 हजार किलोग्रॅम वजनाच्या या बॉम्बची लांबी तीन मीटर आणि रूंदी 71 सेंटिमीटर होती.
- या बॉम्बने आपली विस्फोटक क्षमता युरेनियम -235 च्या आण्विक विखंडन प्रक्रियेतून प्राप्त केली होती.
- तिची विध्वंसक क्षमता 13-18 किलोटन टीएनटी (ट्रायनायट्रोटालूईन) च्या बरोबरीने होते.
काय घडले होते नेमके त्यावेळी-
- फ्रँकलिन रूझवेल्टच्या नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी हॅरी ट्रूम आले होते. दुस-या महायुध्दात जपानने अमेरिकेच्या पार्ल हार्बर बंदरावर हल्ला केला होता.
- त्यामुळे जपानला धडा शिकवावा याबाबत अमेरिकेत मोठे राजकीय खल झाले. 31 जुलै 1945 रोजी ट्रूमन यांनी जपानवर अणुबॉम्ब टाकण्याचा आदेश दिला होता.
- हवामान स्वच्छ असेल, तर हिरोशिमावर बॉम्ब टाकला जावा. लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात यावे. महिला आणि बालकांना यातून वगळले जावे, असे आदेशात म्हटले होते.
पीस पार्कमध्ये दिवा सतत जळतो-
- जपानच्या हिरोशिमा शहरातील पीस पार्कमध्ये एक दिवा सतत जळत आहे. जोपर्यंत जगात विध्वंसक अस्त्रे आहेत, तोपर्यंत तो जळत राहणार असा त्याचा अर्थ आहे.
- 72 वर्षांपूर्वी जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता, तो दिवस होता 6 ऑगस्ट.
- 1945 साली जपानच्या हिरोशिमा शहराची लोकसंख्या होती साडेतीन लाख. त्यातील 1 लाख 40 हजार लोक मारले गेले.
- या हल्ल्यानंतर जागेवरच शरीराचे चामडे उसकटल्याने 70 हजार लोक मृत्यूमुखी पडले. नंतर जखमी व रेडिएशनमुळे 1950 पर्यंत लोक मरत होते.
- तीन दिवसानंतर जपानच्या नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. ज्यात 80 हजार जणांचा बळी गेला. अणुबॉम्ब हल्ल्याचा परिणाम आजही येथील लोक भोगत आहेत.
पुढील स्लाईड्सवर पाहा, हिरोशिमावर अमेरिकेने अणुबॉम्ब हल्ल्याची छायाचित्रे...