आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियाने जन्माला घातला होता हा \'समुद्री राक्षस\', US सह हादरले होते सारे जग!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोवियत युनियनची सी-मॉन्स्टर युद्धनौका - Divya Marathi
सोवियत युनियनची सी-मॉन्स्टर युद्धनौका
इंटरनॅशनल डेस्क- नुकतेच मॉस्को येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सैन्य तथा तांत्रिक फोरम आर्मी-2016 मध्ये रशियाच्या सैनिकांनी 11 हजारांहून अधिक आधुनिक शस्त्रास्त्रे सादर केली. यात रशियाचा सर्वात धोकादायक रोबोट किलरचाही समावेश होता. हा किलर रोबोट तीन किमी दूरवरून आपल्या अचूक निशाण्याद्वारे शत्रूचा नायनाट करू शकतो. असे असले तरी ही काही पहिल्यादाच घडले नाही. रशियाने यापूर्वीही अनेकदा जगाला हादरवून सोडले आहे. जगाला तोंडात बोटे घालायला लावणारी रशियाची घटना सन 1980 साली अमेरिकेने समोर आणली होती. अमेरिकेच्या गुप्त सॅटेलाईटने सोवियत यूनियनच्या ‘सी मॉन्स्टर’ बाबतची माहिती मिळवली....
- 1980 मध्ये रशिया जेव्हा सोवियत यूनियनचा भाग होता तेव्हा अमेरिका, ब्रिटनसह नाटो देशांना धडा शिकविण्यासाठी रशियाने समुद्रात आपला सी- मॉन्स्टर (समुद्री राक्षस) उतरवला होता.
- त्याची ताकत आणि स्पीड पाहून नाटो देशाची घबराट उडाली आणि त्याला ‘सी-मॉन्स्टर’ असे नाव दिले.
- 20 व्या शतकात समुद्रात तरंगणा-या या वॉरशिपचे स्पीड 200 ते 250 किमी प्रतिताशी होते.
- याचे डिझाईन असे काही केले होते हा सी-मॉन्स्टर समुद्रात कधीच बुडू शकत नव्हता.
1980 मध्ये सोवियतच्या मरीन विभागाला दिले होते मशिन-
- सोवियत यूनियनने याची निर्मिती 1975 मध्येच केली होती.
- सुमारे 2 वर्षे त्याच्या टेस्टिंग आणि तांत्रिक बदलाला गेले.
- त्याची लांबी 100 मीटर आणि वजन 544 टन इतके होते.
- यानंतर 1980 मध्ये ही मशिन्स सोवियतने मरीन विभागाला दिली.
- याबाबत सांगितले गेले की, सोवियत यूनियनने अशा आणखी तीन ते चार शिपचे निर्मिती केली होती.
- याशिवाय लहान लहान वॉरशिप सुद्धा बनवली होती. ज्यांचा स्पीड या वॉरशिपपेक्षा जास्त होता.
3 वर्षापर्यंत जगाला लागू दिला नाही थांगपत्ता-
- कॅस्पियन समुद्रात तरंगणा-या या युद्धनौकेबाबत जगाला काहीही माहिती नव्हती.
- सुमारे 3 वर्षानंतर प्रथमच अमेरिकेच्या गुप्त सॅटेलाईटने याचा शोध लावला. तेव्हा अमेरिकेला याचा धक्का बसला.
- यानंतर या युद्ध नौकेची माहिती सार्वजनिक झाली आणि नंतर लक्षात आले की, याच्या वेगामुळे रडार सिस्टम त्याला सहज कॅप्चर करू शकत नव्हते.
- अण्वस्त्राने सज्ज या वॉरशिपमुळे समुद्रात उभ्या असलेल्या युद्धनैकेपर्यंत आवश्यक मदत पोहचवता येत होती.
- यावर लावलेली न्यूक्लियर मिसाईलची रेंज 300 किमीपेक्षा जास्त होती. म्हणजेच ही युद्धनौका शत्रूला काही सेकंदात नामोहराम करू शकत होती.
- वर्ष 1991 मध्ये सोवियत यूनियनच्या विघटनानंतर ही युद्ध नौका रशियाच्या वाट्याला आली. आता ही युद्ध नौका आणखी आधुनिक वॉरशिप म्हणून पुढे आली आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या ‘सी मॉन्स्टर’चे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...