आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका-कतरिनाचे खरे टॅलेन्ट आधी माल्ल्यानेच ओळखले, पाहा त्या 10 अभिनेत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - मनी लॉन्डरिंग प्रकरणी ब्रिटनमध्ये अटक आणि जामिनावर सुटका झालेला विजय माल्या पुन्हा चर्चेत आहे. 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून फरार असलेला विजय माल्या आपल्या किंगफिशर कॅलेन्डरने सुद्धा ओळखल्या जातो. एवढेच काय तर बॉलिवुडमध्ये आघाडीवर असलेल्या आजच्या हिरोईन्स एकेकाळी स्ट्रगल करत होत्या. बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच विजय माल्ल्याने त्यांचे खरे टॅलेन्ट ओळखले होते. अशाच 10 अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ ज्यांच्यासाठी माल्ल्ल्याचे कॅलेन्डर लॉन्च पॅड ठरले आहे. 
 

सर्वप्रथम दीपिका पदुकोणविषयी बोलूया. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये सामील असलेली दीपिकासुध्दा किंगफिशर कॅलेंडर गर्ल आहे. तिचा 'बाजीराव मस्तानी' सिनेमा गतवर्षी 18 डिसेंबरला सर्वत्र रिलीज झाला. तसेच पद्मावती लवकरच रिलीज होणार आहे. आज बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री बनलेली दीपिका पदुकोण 2006 मध्ये किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनली होती. दीपिकासह अनेक नवोदित याला उत्तम प्लॅफॉर्म मानतात. दीपिकाने 2007 मध्ये 'ओम शांती ओम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली.
 

काय आहे किंगफिशर कॅलेंडर?
किंगफिशर कॅलेंडर (स्विमसुट) विजय माल्याच्या यूबी ग्रुपव्दारा पब्लिश केले जाते. भारतात याला मॉडेल्स आणि अभिनेत्रींसाठी बेस्ट लाँचिंग प्लॅटफॉर्म मानले जाते. याची सुरुवात 2003पासून झाली होती. प्रसिध्द फोटोग्राफर अतुल कास्बेकर सुरुवातीपासून याच्याशी जुळले आहेत. 2010पासून नियमित या कॅलेंडरसाठी 'मॉडेल हंट' स्पर्धा सुरु झाली. यासाठी दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, थायलँड, फ्रान्स आणि गोवासारख्या लोकेशन्सवर शूटिंग केली जाते.
 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या आजच्या प्रसिध्द अभिनेत्री एकेकाळी होत्या किंगफिशर कॅलेंडर गर्ल...
बातम्या आणखी आहेत...