आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल ताज ते ओमानच्या सुल्तानचा पॅलेस, पाहा सायरस मिस्त्रीच्या कंपनीचे 10 प्रोजेक्ट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- सायरस मिस्‍त्रींना टाटा समूहाने चेअरमन पदावरून हटविले आहे. रतन टाटांना चार महिन्यांसाठी प्रभारी चेअरमन बनवले गेले आहे. सायरस मिस्‍त्रींना हटविण्याचे कारण तर अद्याप समोर आले नाही. न्या चेअरमनच्या शोधासाठी एक सर्च पॅनेलची निर्मिती केली आहे. सोमवारी टाटा सन्सच्या बोर्ड मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मिस्‍त्रीने चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. सायरस मिस्त्री यांना बिजनेस वर्ल्डमध्ये एक बडी हस्ती म्हणून गणले जाते. कारण ते पालोनजी मिस्त्री यांचा मुलगा आहेत. कंपनीने देश-विदेशात उभा केलेत एकापेक्षा एक शानदार असे प्रोजेक्ट्स...
मूळ गुजराती आणि आता आर्यलंड निवासी असलेले पालोनजी मिस्त्री बांधकाम क्षेत्रात चालणारे हक्काचे नाणे आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार 14 बिलियन डॉलर (सुमारे 90 हजार कोटी रूपये) च्या संपत्तीचे मालक असलेले पालोनजी मिस्त्रींच्या आजोबांनी 1865 मध्ये कंस्ट्रक्शन कंपनी सुरु केली होती. मागील दीडशे वर्षापासून बांधकाम व्यवसायात असलेल्या या कंपनीने देश-विदेशात एकापेक्षा एक असे शानदार प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत.
आयरिश पत्नीमुळे आर्यलँडचे नागरिक बनले-
गुजरातमधील सूरतजवळील वेसा गावात जन्मलेले पालोनजी आयरिश पत्नीमुळे आर्यलंडचे नागरिक बनले. त्याचा मोठा मुलगा शापूरजी मिस्त्री आपली कंस्ट्रक्शन कंपनी संभाळतात. तर छोटा मुलगा सायरस मिस्त्री टाटा समूहाचे चेअरमन होते. एवढेच नव्हे तर पालोनजी मिस्त्रींच्या कंपनीबाबत सांगितले जाते की, त्यांनी बनवलेल्या बिल्डिंग्स काळासोबतच एक लँडमार्क म्हणून पुढे येत आहेत.
शापूरजी पालोनजी कंपनीने इंस्टीट्यूशंस, इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी पार्क्स, रेसिडेंसियल बिल्डिंग्स, कॉमर्शियल बिल्डिंग्स, इंडस्ट्रियल, स्टेडियम, हॉस्पिटल्स आणि हॉटेल्स यासारखे शेकडो प्रोजेक्ट निर्माण केले आहेत. ओमानचे सुल्तान यांचा पॅलेस सुद्धा पालोनजी यांच्या कंपनीने डिझाईन केला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पालोनजी मिस्त्री कंस्ट्रक्शंसचे अन्य प्रोजेक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...