आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढ्या अणुबॉम्ब चाचण्या, की समुद्र आटला! बदलले नद्यांचे प्रवाह...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - अणुबॉम्बच्या चाचण्या घेऊन उत्तर कोरिया सध्या जगभरात चर्चेत आहे. 3 सप्टेंबर रोजी उत्तर कोरियाने घेतलेल्या चाचणीत 6.3 रिक्टर स्केलचा भूकंप आला होता. पुंग्येरी हे उत्तर कोरियाच्या अणु चाचण्यांचे गड आहे. याच ठिकाणी चाचण्या घेतल्या जात असल्याने येथील जमीन पूर्णपणे निष्क्रीय झाली आहे. तज्ञांनी ही जागा आता चाचणीसाठी योग्य राहिलेली नाही असे घोषित केले. अणु चाचण्या घेऊन निकामी झालेली ही एकमेव जमीन नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जमीनीबद्दल सांगणार आहोत. ती जमीन होती वोजरोझदेनिया बेट... त्यावेळच्या सोव्हिएत युनियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियासाठी अणु बॉम्बचे टेस्टिंग ग्राउंड बनले होते. 
 

अणु चाचण्यांमुळे समुद्र आटला, नद्यांचे प्रवाह बदलले
>> शीत युद्धाच्या वेळी अमेरिकेला आपली ताकद दाखवण्यासाठी सोव्हिएत संघाने शेकडो अण्वस्त्र चाचण्या घेतल्या. त्यावेळी उजबेकिस्तान आणि रशिया एकच होते. सध्या उजबेकिस्तानच्या सीमेजवळ असलेले वोजरोझदेनिया आयलंड रशियाच्या चाचण्यांचे केंद्र होते. 
>> 4000 चौरस किमीपर्यंत पसरलेल्या याच बेटाला रशियाने आपले सीक्रेट टेस्टिंग ग्राउंड बनवले होते. अण्वस्त्र चाचण्यांसह अनेक शस्त्र आणि क्षेपणास्त्रांच्या चाचण्या रशियाने या ठिकाणी घेतल्या. रशियाने या बेटावर एका पाठोपाठ एक सलग 60 ते 70 अणु चाचण्या घेतल्या होत्या.
>> विशेष म्हणजे, निर्जण बेट असलेल्या या ठिकाणी एकही सामान्य मनुष्य राहत नव्हता. अतिशय गुप्तरीत्या सोव्हिएत रशियाने बांधलेले हे बेट 1991 मध्ये सोव्हिएतचे तुकडे झाल्यानंतर जगासमोर आले होते. 
>> तोपर्यंत रशियाने या बेटावर एवढ्या अणु चाचण्या घेतल्या होत्या की बॉम्बच्या उष्णतेने जवळपासच्या परिसरातील समुद्र आटला होता. नद्यांनी सुद्धा आपली दिशा बदलली. त्यामुळे, हा भाग हळू-हळू वाळवंटात परिवर्तित झाला. 
>> सोव्हिएत संघाचे विभाजन झाल्यानंतर उजबेकिस्तानचा भाग झालेल्या या बेटावरील केमिकल कचरा काढण्याचा वेळोवेळी प्रयत्न करण्यात आला. मात्र, रेडिएशनमुळे (किरणोत्सार) हा परिसर मानवी वस्तीसाठी योग्य राहिला नाही. 
>> रशियाने सैन्या हटवल्यानंतर आता या ठिकाणी आर्मी बेस, रासायनिक कारखाने आणि बंदर उभारण्यात आले आहे. कित्येक युद्धनौका या ठिकाणी उभ्या केल्या जातात.
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, या बेटावरील आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...